Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठाच्‍या चुकीमुळे हुकला पदवी प्रवेश, अनेक विद्यार्थ्यांना त्रास; आलेमाव यांच्याकडून दखल

Goa Assembly: गोवा विद्यापीठाकडून सुधारित गुणपत्रिका देण्यास वर्षभराचा विलंब लावण्यात आला. एका विद्यार्थ्याने कायदेशीर नोटीस बजावल्यावर तासाभरात अशी गुणपत्रिका दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा विद्यापीठाकडून सुधारित गुणपत्रिका देण्यास वर्षभराचा विलंब लावण्यात आला. एका विद्यार्थ्याने कायदेशीर नोटीस बजावल्यावर तासाभरात अशी गुणपत्रिका दिली. या सगळ्या घोळात त्या विद्यार्थ्यांचा कायदा पदवीचा प्रवेश हुकला, हा मुद्दा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज शून्य तासाला विधानसभेत उपस्थित केला.

किमान २० विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार गोवा विद्यापीठाने केला आहे. गेल्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण होऊनही गुणपत्रिका देण्यास विद्यापीठाने टाळाटाळ चालवली होती. अखेर कुंकळ्ळीतील एका विद्यार्थ्याने कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर काही तासांतच तशी गुणपत्रिका त्याला देण्यात आली. तो कायदा पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरुनही केवळ गुणपत्रिका उशिरा मिळाल्याने त्याचा प्रवेश हुकला आहे. सरकारने यात लक्ष घालून अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यावा, असे आलेमाव म्‍हणाले. त्‍यावर, मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर काय करता येते ते पाहतो, असे उत्तर दिले.

बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनी सांगितले की, माजोर्डा-उतोर्डा येथील किनारे दुर्लक्षित राहिलेले आहेत. त्या किनाऱ्यांकडे जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. पर्यटकांच्या सोयीसाठी स्थानिक लाकडी पूल बांधतात.

कंत्राटी कामगारांना कायम करणे शक्‍य नाही: डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले की, विविध सरकारी खात्यांमध्ये कंत्राटावर अनेक वर्षे अनेकजण सेवा बजावत आहेत. त्यांची सेवा नियमित करण्याचा विचार सरकारने करावा यासाठी एखादी योजना तयार करावी. त्‍यस उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्‍हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार त्यांना सेवेत कायम करता येणार नाही. त्यांना रजा व इतर सुविधा देण्याविषयीचा सरकारने विचार चालवला असून काही पावले टाकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT