Goa University Dainik Gomantak
गोवा

Goa: देशातील प्रथम 100 विद्यापीठांच्या यादीतून गोवा विद्यापीठ बाहेर

Goa University: विद्यापीठाचा दर्जा घसरल्याने चिंता वाढली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: देशातील प्रथम 100 विद्यापीठांच्या यादीतून गोवा विद्यापीठ बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून विद्यापीठाचा दर्जा घसरला असून घसरण सुरूच आहे. ही चिंतेची बाब आहे,कारण विद्यापीठाच्या अंतर्गत सुमारे 27 हजार विद्यार्थी आहेत, असा उल्लेख फातोर्डाचे आमदार विजय आमदार सरदेसाई यांनी आज विधानसभेत शून्य तासात केला.

विद्यापीठाचा दर्जा घसरल्याच्या गोष्टीची नोंद घेतली असून, याबाबत सरकार चिंतीत आहे, असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सांगितले. एकेकाळी गोवा विद्यापीठ हे देशातील 100 प्रथम विद्यापीठांपैकी एक होते. परंतु हल्लीच्या काळात विद्यापीठाचा दर्जा घसरला असून. काही वर्षापूर्वी विद्यापीठाचा क्रमांका 81 होता. त्यानंतर 96 पोहोचला आणि आता थेट 100 च्या बाहेरच आपण गेलो आहोत. ही गंभीर बाब आहे कारण विद्यापीठाशी सुमारे 53 महाविद्यालये संलग्न आहेत.

त्यापैकी 29 सामान्य आहे, तर 24 व्यावसायिक आहे. सुमारे 27 हजार विद्यार्थी हे थेट विद्यापीठांतर्गत आहेत. दर्जा खालवल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतात. नोकरभरती होताना विद्यापीठाची गुणवत्ता बघितली जाते, अशी चिंता सरदेसाई यांनी व्यक्त केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT