Goa University Exam Dainik Gomantak
गोवा

Goa University Exam: बी.कॉम. तिसऱ्या वर्षाचा पेपर पुढे ढकलला; आता 'या' तारखेला होणार

'अभाविप'ची मागणी मान्य

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa University: गोवा विद्यापीठाच्या बी. कॉम. तिसऱ्या वर्षातील सेमीस्टर सहाची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. पुर्वीच्या वेळापत्रकानुसार हा पेपर 4 मे रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार होता. पण त्याच दिवशी NTA तर्फे आयोजित CMAT MBA ची प्रवेश परीक्षा होणार आहे.

4 मे रोजी बी.कॉम. तिसऱ्या वर्षातील सहाव्या सेमिस्टरमधील अकाऊंटिंग 1, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटिंग : कॉस्ट अँड मॅनेजमेंट ऑडिट, बिझनेस मॅनेजमेंट : स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस : लॉ अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग हा पेपर नियोजित होता.

या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठाने आता हा पेपर पुढे ढकलला आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता हा पेपर 11 मे रोजी होईल.

गोव्यातील अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत अभाविपशी संपर्क साधला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) हा मुद्दा उपस्थित प्रशासनाच्या लक्षात आणून दिला होता. कुलसचिवांशी याबाबत अभाविपने चर्चा केली होती. त्यानंतर गोवा विद्यापीठाने प्रशासनाने ही कार्यवाही केल्याचे विद्यार्थी संघटनेने म्हटले आहे. आता हा पेपर 11 मे रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT