Goa University Dainik Gomantak
गोवा

Panaji News : गोवा विद्यापीठाने घेतली अखेर ‘ती’ वादग्रस्त अधिसूचना मागे

विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना पत्र लिहून या प्रकरणी त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, गोवा विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकरणावर मूकबधिर किंवा कर्णबधिर व्यक्तीची नियुक्ती केल्यास त्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील अधिसूचना विद्यापीठाकडून मागे घेण्यात आली आहे.

गोवा दिव्यांग हक्क संघटनेद्वारे (ड्रॅग) आक्षेप घेऊन या प्रकरणी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना पत्र लिहून त्यांनी कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

गोवा विद्यापीठाने काल जारी केलेल्या अधिसूचनेची तीव्र दखल घेत मूकबधिर व्यक्तींना विद्यापीठाच्या संस्थेच्या पदांवर नियुक्त करण्यापासून वंचित ठेवत अपंग व्यक्तींशी भेदभाव केल्याबद्दल

आणि अपंग व्यक्तींच्या अधिकार अधिनियम २०१६ च्या कलम ३ चे उल्लंघन केल्याबद्दल गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ड्रॅग संघटनेने केली आहे.

तसेच यासंबंधी गोवा विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना पत्र लिहून या प्रकरणी त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष आवेलिनो डिसा यांनी म्हटले आहे की, गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यांना अपंग व्यक्तींच्या हक्क कायदा २०१६ मधील मूलभूत तरतुदींची जाणीव नसल्याने असे भेदभाव करणारे ठराव पारित करत आहेत.

अशाप्रकारच्या निर्णयाने आम्हाला धक्का बसला आहे. विद्यापीठाने भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अपंग व्यक्तींना गोवा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नामांकन मिळावे अशी आमची मागणी असून यासंबंधी आम्ही राज्यपालांना देखील भेटणार आहे.

अनवधानाने झाली चूक ः विद्यापीठ

गोवा विद्यापीठात जे दिव्यांग बहिरे, मूक आहेत किंवा सांसर्गिक कुष्ठरोगाने ग्रस्त आहेत त्यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भारत सरकारच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने अलीकडेच सुधारीत कायदा अधिसूचित केला आहे.

कोणत्याही प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीला दुखावण्याचा विद्यापीठाचा हेतू नाही आणि विद्यापीठाच्या बाजूने ही अनवधानाने झालेली चूक होती. विद्यापीठाला हे देखील स्पष्ट करायचे आहे की प्रत्यक्षात असा कोणताही भेदभाव केला जात नाही

आणि प्रचलित नियम आणि नियमांनुसार विविध अपंग व्यक्तींची विविध पदांवर यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा विद्यापीठाचा कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही आणि या अनवधानाने झालेल्या चुकीबाबत खेद व्यक्त करत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

कुलगुरूंच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह!

गोवा विद्यापीठ हे मागील काही महिन्यांपासून विविध घटनांमुळे सातत्याने चर्चेत येत आहे. कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांचे विविध प्रश्‍न, विद्यापीठातील आंतरिक समस्या सोडविण्यात ते अकार्यक्षम ठरत असल्याने त्यांच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

SCROLL FOR NEXT