Shripad Naik |  Dainik Gomantak
गोवा

Goa: केंद्रीय मंत्री 'श्रीपाद नाईक' यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

Shripad Naik यांचा वाढदिवस त्यांच्या सापेंद्र, रायबंदर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दैनिक गोमन्तक

Goa: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस त्यांच्या सापेंद्र, रायबंदर येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध वैद्यकीय शिबिरांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

याप्रसंगी कला आणि सांस्कृतिक आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार दिगंबर कामत, माजी सभापती राजेश पाटणेकर, आमदार राजेश फळदेसाई, आमदार दाजी साळकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार रामू नाईक, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक उपस्थित होते.

वैद्यकीय शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. मोफत औषधेही यावेळ देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सोहळ्यास गेली पंचवीस वर्षे अखंडपणे उत्तर गोव्यातून निवडून येण्याचा विक्रम केलेल्या श्रीपाद नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या शेकडो चाहत्यांनी उपस्थिती लावली. यात सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील गोव्यातील आणि गोव्याबाहेरील लोकांचा समावेश होता.

'गाणी मनातली' मैफल रंगली

संध्याकाळी आयोजिण्यात आलेल्या आयडिया सारेगम फेम अमोल आणि अभिषेक पटवर्धन यांच्या अजरामर भक्तिगीते, भावगीते आणि नाट्यगीतांवर आधारित ''गाणी मनातली'' ही मैफल रंगली. याशिवाय दिवसभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. या कार्यक्रमांना भाऊंचे हितचिंतक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुभेच्छांचा वर्षाव: सकाळपासून श्रीपादभाऊंना अनेकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. काही हितचिंतकांनी फोनवरून, ट्वीटव्दारे शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT