Goa Bank | UCO Bank  Dainik Gomantak
गोवा

Goa Bank: गोवा युको बँकेला अडीच कोटींचा 'गंडा'

Goa Bank: बॅंकेची 2 कोटी 63 लाख 7 हजार 280 रुपयांची फसवणूक केली.

दैनिक गोमन्तक

Goa Bank: बनावट सोने तारण ठेवून वेर्णा येथील युको बॅंकेला 2 कोटी 63 लाख 7 हजार 280 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने सोनारासह दोघांना अटक केली आहे.

दरम्यान, अटक झालेल्यांमध्ये सुरावली, कोलवा येथील सोनार हेमंत रायकर (वय 54) आणि मुगाळी-कुडतरी येथील कर्जदार गुंडू केळवेकर (वय 43), या दोघांचा समावेश आहे. जुलै 2019 ते डिसेंबर 2021 या काळात हा गुन्हा घडल्याचे युको बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानानंद शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे.

संशयितांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे त्यात नमूद केले आहे. कर्जदाराने तारण म्हणून ठेवलेले बनावट सोने या सोनाराने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेला दिले होते. कर्ज थकले, व्याज वाढत गेले आणि सोने लिलावात काढण्याची वेळ आली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

वैयक्तिक खात्यात वळवली कर्जाची रक्कम

संशयिताने युको बॅंकेच्या वेर्णा, फातोर्डा व मडगाव शाखेतून कर्ज घेतले होते. ज्या कारणासाठी कर्ज घेतले होते, त्यासाठी ते न वापरता ही रक्कम वैयक्तिक खात्यात वळवली, असे या तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा अन्वेषण शाखेच्या आर्थिक विभाग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT