Goa Trinamool Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Trinamool Congress: मुन्नालाल हलवाई यांच्यावरील हल्ल्याचा तृणमूल काँग्रेसकडून निषेध

Goa Trinamool Congress: मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडली आहे, तृणमूलची सरकारवर टीका.

दैनिक गोमन्तक

Goa Trinamool Congress: माहिती हक्क कार्यकर्ते मुन्नालाल हलवाई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने राज्यातील प्रत्येक सुजाण नागरिकाच्या भावनांना धक्का बसला आहे. माध्यमांना संबोधित करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करणे हा थेट अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर केल्यासारखे आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडल्याने हल्लेखोरांना कोणाची भीती नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष हल्ल्याचा निषेध करतो आणि हल्ला करणाऱ्याला त्वरित अटक करावी अशी मागणी करत आहे, असे पक्षाचे प्रसार माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो म्हणाले.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था संगनमताशिवाय असा निर्भय हल्ला खुलेआमपणे केला जाऊ शकतो का? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि विशेषत: पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरील या हल्ल्याचा तीव्र निषेध आहे.

अशा घटना दिवसाढवळ्या व्हायला लागल्या, म्हणजे कायदा व सुव्यवस्था हाताबाहेरच गेल्याचे दिसून येत आहे. पोलिस यंत्रणा खरोखरच चोख असेल, तर हल्लेखोराला लगेच गजाआड करतील, अन्यथा ते अकार्यक्षम असल्याचे सिद्ध होणार आहे, असे डिमेलो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT