Goa TribalCommunity Development Dainiak Gomantak
गोवा

Goa Tribal Culture: आदिवासी विकासासाठी सरकारचा कृती आराखडा; 11 विषयतज्ज्ञ समित्यांची घोषणा; शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर लक्ष केंद्रित

Goa TribalCommunity Development : राज्‍यातील आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्‍यासाठी सरकारने ‘आदिवासी दूरदृष्‍टी : 2037 चा कृती आराखडा तयार करण्‍याकरीता विविध अकरा समित्‍यांची स्‍थापना केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्‍यातील आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्‍यासाठी सरकारने ‘आदिवासी दूरदृष्‍टी : २०३७’चा कृती आराखडा तयार करण्‍याकरीता विविध अकरा समित्‍यांची स्‍थापना केली आहे. आदिवासी कल्‍याण खात्‍याचे संचालक नीलेश धायगोडकर यांनी याबाबतची अधिसूचना जारी केल्‍या आहेत.

अधिसूचनेनुसार, आदिवासी समाजातील नागरिकांच्‍या रोजगारासंदर्भात स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या समितीच्‍या अध्‍यक्षपदी मानसोपचार इस्‍पितळाचे साहाय्‍यक प्राध्‍यापक सुदेश गावडे, परंपरा आणि संस्‍कृती संवर्धन समितीच्‍या अध्‍यक्षपदी वस्‍त्रोद्योग आणि हस्‍तकला खात्‍याचे संचालक सगुण वेळीप, क्रीडा समितीच्‍या अध्‍यक्षपदी क्रीडा खात्‍याचे संचालक अजय गावडे, योजनांसंदर्भातील समितीच्‍या अध्‍यक्षपदी क्रीडा (प्रशासन) संचालक मंगलदास गावकर, आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षपदी दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळाच्‍या फॉरेन्‍सिक मेडिसीन विभागाचे साहाय्‍यक प्राध्‍यापक डॉ. मधू घोडकिरेकर यांची निवड करण्‍यात आली आहे.

तसेच साधनसुविधा समितीच्‍या अध्‍यक्षपदी जलस्रोत खात्‍याचे अतिरिक्त मुख्‍य अभियंता अंकुश गावकर, शिक्षण समितीच्‍या अध्‍यक्षपदी आमोणे सरकारी हायस्‍कूलचे मुख्‍याध्‍यापक डॉ. उल्‍हास गावकर, महिला सक्षमीकरण समितीच्‍या अध्‍यक्षपदी पैंगीण बलराम हायस्‍कूलच्‍या मुख्‍याध्‍यापिका सविता तवडकर, जमीन तसेच घरांसंदर्भातील समितीच्‍या अध्‍यक्षपदी कला अकादमीचे सदस्‍य सचिव शंकर गावकर, आदिवासी साहित्‍य समितीच्‍या अध्‍यक्षपदी आदिवासी साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष रामनाथ गावडे आणि कृषी संदर्भातील समितीच्‍या अध्‍यक्षपदी मडगावचे अतिरिक्त जिल्‍हाधिकारी-२ रमेश गावकर यांची नेमणूक करण्‍यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Konkani Language Debate: मराठी आणि कोंकणीच्या संघर्षातून भाजपचा राजकीय उदय

PM Kisan Scheme Update: 'पीएम किसान योजना' बंद होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केला पुढील पाच वर्षांचा रोडमॅप

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

SCROLL FOR NEXT