Chamber Of Commerce  Dainik Gomantak
गोवा

Chamber Of Commerce: वाहनचालकांची सतावणूक, खराब रस्त्यांमुळे होणारा परिणाम; चेंबर ऑफ कॉमर्स बैठकीत चर्चा

Chamber Of Commerce Meeting: गोव्यातून भाजी खरेदी करणारे मध्यस्थ भाजी व्यापाऱ्यांना पैसे देत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्नाटकातून माल घेऊन येणाऱ्या वाहन चालकांची गोव्यातील वाहतूक पोलिसांकडून सतावणूक करण्यात येते असा मुद्दा बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने गोवा चेंबर ऑफ कॉमर्स सोबतच्या संयुक्त बैठकीत उपस्थित केला. गोव्यातून भाजी खरेदी करणारे मध्यस्थ भाजी व्यापाऱ्यांना पैसे देत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

बेळगावचे आमदार अभय पाटील यांनी या बैठकीत सांगितले की, गोव्यातून ५ हजार वाहने बेळगावमध्ये खरेदीसाठी येतात. या वाहन चालकांची बेळगाव वाहतूक पोलिसांकडून सतावणूक होते अशी तक्रार आल्यावर स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून असे प्रकार तत्काळ थांबवण्याची व्यवस्था केली आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सने हा विषय गोवा सरकारकडे नेऊन बेळगावमधील वाहन चालकांची गोव्यातील सतावणूक बंद करावी.

गोवा आणि कर्नाटकातील उद्योजकांनी एकत्र येण्यासाठी गोवा कर्नाटकातील रस्ता मार्गे संपर्क अधिक सक्षम करण्यासाठी हा विषय केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नेण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले आहे. या बैठकीत अनमोड ते रामनगर या रस्त्याच्या दुरुस्तीला दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लागत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. केवळ आठ किलोमीटरचा रस्ता दहा वर्षांत दुरुस्त का होऊ शकत नाही अशी विचारणा या बैठकीत करण्यात आली.

रामनगर ते खानापूर या रस्त्याचीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तसेच गोव्याची सीमा ते जांबोटीपर्यंतच्या रस्त्याची चांगली दुरुस्ती केव्हा केली जाईल याविषयी चर्चा करण्यात आली. हा विषय अखेर केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव चेंबरचे अध्यक्ष संजीव कट्टीशेट्टी, गोवा चेंबरच्या लॉजिस्टिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गावस, चेंबरचे महासंचालक संजय आमोणकर, विजय सातार्डेकर आदी या बैठकीत सहभागी झाले होते.

खराब रस्त्यांमुळे व्यापारावर परिणाम

दोन्ही राज्यातील व्यापार या रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे संकटात आल्याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. बेळगावमधील उद्योजक मुरगाव बंदरात कंटेनर पाठवण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या त्यांना गोव्यातून येणाऱ्या रस्त्यांची स्थिती बिकट असल्याने मंगळूर बंदराचा वापर करावा लागत असल्याचा विषय बैठकीत चर्चेला आला. मोपा विमानतळावर लॉजिस्टिक हब होणार असल्याने बेळगावचे आमदार अभय पाटील यांनी तिळारी मार्गे बेळगावला येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज या बैठकीत व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

SCROLL FOR NEXT