Goa Traffic Jam File Photo
गोवा

Goa Traffic Jam: गोव्यात वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांची गळचेपी! पण मेरशी जंक्शनवरील AI कॅमेरे बंद का?

मेरशी जंक्शनवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे लावल्याच्या 5 दिवसांच्या आतच काल मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

दैनिक गोमन्तक

Goa Traffic Jam: राज्यभरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्याआणि इतर कामांमुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जामचे चित्र दिसून येत आहे. तब्बल चार-चार तास वाहनचालकांना या जाममध्ये अडकून राहावे लागत असल्यामुळे राज्यभरात नाराजीचा सूर उमटत आहे.

मेरशी जंक्शनवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे लावल्याच्या 5 दिवसांच्या आतच काल मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. अटल सेतू पुलाच्या कामाच्या वाहनांची कोंडी झाली असून अशीच परिस्थिती पुढे 27 मार्चपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

राज्यात सरकारी एजन्सींमधील समन्वयाच्या अभावामुळे वाहतूक समस्या वाढल्या आहेत तर पणजीलाही स्मार्ट सिटीच्या अनियोजित कामांचा आणि पुढे होणाऱ्या G20 शिखर परिषदेच्या तयारीचा रोष सहन करावा लागत आहे.

जवळपास 10 महामार्ग, रस्ते आणि सर्व्हिस लेन यांना जोडणाऱ्या मेरशी जंक्शनवरील वाहतूक कोंडी मंगळवारी संध्याकाळी नियंत्रणाबाहेर गेली. यामुळे अधिकाऱ्यांना AI बंद कॅमेरे करावे लागले. अटल सेतूचे काम पूर्ण होईपर्यंत परिस्थिती अशीच राहण्याची अपेक्षा आहे. “जोपर्यंत अटल सेतूचे काम सुरू आहे तोपर्यंत AI कार्य करणार नाही,” असे मत सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मामू हागे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा प्रशासनाने अटल सेतूचे काम दोन टप्प्यात करण्याची वाहतूक विभागाची सूचना कथितपणे नाकारली कारण यामुळे वाहतूक व्यवस्थापित करण्यात मदत झाली असती, विशेषत: गर्दीच्या वेळी.

प्रत्येक काम दोन टप्प्यात हाती घेण्याच्या सूचना असूनही 27 मार्चची अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी प्रशासन अटल सेतूच्या दोन्ही बाजू बंद करण्यावर ठाम होते. याचा परिणाम पणजी, पर्वरी आणि सांताक्रुझ, मेरशी आणि ताळगावच्या बाहेरील भागात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत.

हागे यांनी दिलेल्या आदेशानुसार 17 ते 27 मार्च या कालावधीत 10 दिवस हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. G20 शिखर परिषदेच्या VIP प्रतिनिधींना या मार्गावरून दौऱ्यावर नेले जाणार असल्याने डांबरीकरणाची कामे करण्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. पणजीतील निवडक रस्त्यांचे हॉट मिक्सिंग पुढील महिन्यात सुरू होणार्‍या आगामी कार्यक्रमासाठी देखील केले जात आहे. पण या सर्व कामांमुळे शहराची मात्र गळचेपी झाली आहे. यामुळे वाहनचालक आणि नगरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT