गोवा, पर्यटन मोसम, पर्यटक इत्यादी... Dainik Gomantak
गोवा

गोवा, पर्यटन मोसम, पर्यटक इत्यादी...

विदेशातील उच्च दर्जांच्या पर्यटकाना मोहवतील अशा सुविधा गोवा राज्यात आणि किनारी भागात उपलब्ध आहेत का?

दैनिक गोमन्तक

पर्यटन मोसम सुरू झाला आहे. चार्टर्ड विमानांकडे सारे डोळे लावून बसले आहेत. आता प्रश्न असा आहे, विदेशातील उच्च दर्जांच्या पर्यटकाना मोहवतील अशा सुविधा राज्यात आणि किनारी भागात उपलब्ध आहेत का?, दरवर्षी पर्यटक खाते व सरकार विदेशात जावून राज्यातील पर्यटन व्यवसायाला उभारी मिळावी यासाठी उच्चारवाने  जाहिरातबाजी करते मात्र येणाऱ्या पर्यटकांना अपेक्षित किनारी सोयी सुविधा मात्र पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे किनारी भागात तारांकित हॉटेल निवासी सोयी नसल्याने या भागात उच्च दर्जाचे पर्यटक येत नाहीत . पेडणे तालुक्याचाच विचार केला तर मोरजी , आश्वे-मान्द्रे , हरमल आणि केरी, तेरेखोल हे या किनारी भागात एकही तारांकित सोयी-सुविधा असलेले हॉटेल नाही. सुरक्षा व्यवस्थेचेही तीन तेरा वाजलेले असतात. शिवाय किनाऱ्यावरचा  कचरा, वारंवार होणारे ध्वनिप्रदूषण, गुरे-ढोरे त्याचाही त्रास पर्यटकांना होत असतो. गोव्याचे हे असे अस्वस्थ करणारे चित्र आंतराष्ट्रीय स्तरावर पर्यटकामध्ये बिंबले गेले आहे. त्यामुळे दर्जेदार पर्यटक आजही या किनारी भागात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत नाहीत.

किनारी भागात आज स्वस्त पर्यटक दिसतात. गट करून एखादे घर किंवा खोली भाड्याने घेवून ते राहतात. रात्रीही किनाऱ्यावर झोपतात. हॉटेलवर जेवण्यापेक्षा ते स्वत:च खोलीवर स्वयंपाक करून जेवतात. हॉटेलवर भाजीपाव खावून दिवस घालवतात. काही धंदेवाईक पर्यटक रात्रीच्या वेळी संगीत पार्टीचे आयोजन करतात, हॉटेल चालवतात, संगीत पार्ट्यांचे जाहिरात फलक रस्त्यावर आपणच लावतात. बेकायदा व्यवसायातही त्यांचाच हात असतो. .काही पर्यटक ड्रग्स व्यवहारातही सामील असतात. अशा पर्यटकांकडून स्थानिक व्यवसायिकानाही अजिबात फायदा होत नाही.

हे चित्र गोव्याच्या एकाच भागाचे नाही तर उत्तरेतल्या साऱ्यात समुद्रकिनाऱ्यांचे आहे. अशा पर्यटनामुळे राज्याच्या साधंन-सुविधांवर ताण पडतोच पण एकदा अशातऱ्हेची प्रसिद्धी झाल्यावर जागतिक पातळीवर देखील राज्याची बदनामी व्हायला सुरुवात होते. गोवा आतापर्यंत जगातल्या चांगल्या सौंदर्य स्थळांच्या यादीत समाविष्ट होते. मात्र या यादीत टिकून राहण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या मात्र हळूहळू हरवत चालल्या आहेत.

आज विदेशी पर्यटकांची गर्दी राज्यात खूप वाढलेली आहे. भारतातल्या इतर स्थळांपेक्षा गोवा अधिक ‘मोहमयी’ आहे हे त्यातून सिद्ध होते. मात्र देशी पर्यटक हा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटकाना पर्याय होऊ शकत नाही. उलट काही देशी पर्यटकांच्या वागण्यामुळे गोव्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का ही लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे नाव अबाधित राखायचे असेल तर उच्च दर्जाचे पर्यटक गोव्यात येतील अशातऱ्हेच्या साधंन- सुविधांची व्यवस्था गोव्यात निर्माण व्हायला हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT