Goa Beach Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shacks: पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यामुळे बहुतेक शॅक्स 31 मेच्या अंतिम मुदतीपूर्वी बंद

ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगामाच्या सुरुवातीपासून समुद्रकिनाऱ्यावरील शॅकमध्ये चांगला व्यवसाय दिसून आला आहे, परंतु त्यापैकी बहुतेकांनी 31 मे च्या अंतिम मुदतीपूर्वी आपले शॅक्स दोन आठवडे बंद केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Beach Shacks: राज्यात आलेल्या पर्यटकांची वर्दळ असणारा भाग म्हणजे इथले समुद्रकिनारे. बीचवर येणाऱ्या पर्यटकांमुळे शॅक्सचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. यंदाचा पर्यटन हंगाम आधीच्या हंगामापेक्षा समाधानकारक असल्याचे मत शॅक्सचालकांनी व्यक्त केले. मात्र आता हंगाम संपत आल्याने त्यांनी आपले शॅक्सचे बांधकाम तोंडण्यास सुरुवात केली आहे.

माहितीनुसार, पर्यटकांच्या संख्येत घट झाल्यामुळे बहुतेक शॅक्स 31 मेच्या अंतिम मुदतीपूर्वीच बंद करावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगामाच्या सुरुवातीपासून समुद्रकिनाऱ्यावरील शॅकमध्ये चांगला व्यवसाय दिसून आला आहे, परंतु त्यापैकी बहुतेकांनी 31 मे च्या अंतिम मुदतीपूर्वी आपले शॅक्स दोन आठवडे बंद केले आहेत.

उत्तर गोव्यातील काही समुद्रकिनाऱ्यांचा भाग व कोलवा समुद्रकिनारा वगळता, राज्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक्स या हंगामात लवकर बंद झाले आहेत, तरीही देशांतर्गत पर्यटन काही प्रमाणात सुरूच आहे.

पारंपारिकपणे, काही समुद्रकिनाऱ्यांवरील बीच शॅक हे एक आठवडा लवकर बंद होत असतात. तर अनेक शॅक्सचालकांनी एप्रिलमध्ये गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (GSPCB) च्या संमतीशिवाय शॅक्स चालवल्याने त्यांना काही काळासाठी शॅक्स बंद करावे लागले होते. मात्र त्यानंतर पुन्हा शॅक्स ऑपरेट करण्याची संमती मिळाल्यानंतरही त्यांनी यावेळी शॅक्स पुन्हा न उघडण्याचा निर्णय घेतला.

याबाबत गेल्या आठवड्यात पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांच्याशी बीच शॅक धोरणावर चर्चा करण्यात आली होती. मात्र यावेळी अनेकांना उपस्थित राहता आले नाही. या पार्श्वभूमीवर बीच शॅक मालकांच्या संस्थेने पर्यटन मंत्र्यांना विनंती केली आहे की, जेव्हा धोरणासाठी शॅक मालकांकडून इनपुट घेतले जातील तेव्हा मीटिंग पुन्हा घेण्यात यावी.

या महिन्यात बीच शॅक पॉलिसीला मुदतवाढ मिळाल्याने पर्यटन विभाग शॅक्सचे वाटप करू शकणार नाही असे सांगण्यात येत आहे. कारण एका वरिष्ठ पर्यटन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या धोरणातील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांना बीच शॅक धोरणात काही बदल करायचे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT