Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

राज्यात येणारे पर्यटक म्हणतायत, गोव्यात..

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी इथल्या सुविधांबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: गोव्याचे पर्यटन हे फक्त देशातच नव्हे तर परदेशातही लोकांचे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. इथे दरवर्षी पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळते. सुट्टीची धमाल अनुभवण्यासाठी लोक आपल्या मित्रमंडळींसोबत आणि परिवारासोबत गोव्यात येत असतात.

पण गोव्यात येणार्‍या याच पर्यटकांना गोव्यातील अनेक समस्या भेडसावत आहेत. यासंदर्भात गोव्यातील एका खाजगी वाहिनीने पर्यटकांशी संपर्क साधला असता त्यांना भेडसावणार्‍या प्रश्नांबद्दल जाणून घेतले आहे.

दळणवळणाची सुविधा

अत्यंत महत्त्वाची आणि अनेक वर्षांपासून इथे येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे दळणवळणाची सुविधा. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची ही तक्रार आहे की इथे आल्यावर ट्रान्सपोर्टसाठी त्यांना इथल्या टॅक्सी सुविधांचा वापर करावा लागतो. सार्वजनिक बसेस कमी असल्यामुळे किंवा पर्यटनस्थळी जाणाऱ्या बसेस कमी असल्यामुळे पर्यटकांना महागड्या टॅक्सी चालकांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचबरोबर टॅक्सीचालकांचे पर्यटकांसोबत असलेले गैरवर्तन यामुळे तर अनेक पर्यटक हैराण झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना सगळ्यात पहिल्यांदा गोव्यात येऊन जर कोणती गोष्ट अपेक्षित असेल तर ती म्हणजे दळणवळणाची सुविधा. गोव्यात प्रवास करण्यासाठी त्यांना शेकडो रुपये मोजावे लागत आहेत. या अनुभवामुळे अनेक पर्यटक पुन्हा गोव्यात यायचे नाही अशा पावित्र्यात असल्याचे दिसून आले.

त्याचबरोबर गोव्यामध्ये अजूनही ओला (Ola) आणि उबेर (Uber) ची सुविधा नाही. अनेक पर्यटकांनी गोव्यामध्ये टॅक्सीपेक्षा ओला आणि उबेरची सुविधा करण्याची मागणी केली आहे.

गोव्यातील महागडे रेस्टॉरंट्स

अनेक पर्यटकांनी गोव्यात मिळणाऱ्या महागड्या अन्नपदार्थांबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे गोव्यात मिळणारे पदार्थ हे अत्यंत महाग विकले जातात अशी त्यांची तक्रार आहे

स्ट्रीटफूडची मागणी

गोव्यात आपल्याला साधा चहा जरी घ्यायचा असला तरी हॉटेलमध्ये जावे लागते. त्यामुळे गोव्यात स्वस्तात मस्त मिळणारे स्ट्रीटफूड इथे असावे, असे मत काही पर्यटकांनी व्यक्त केले. सर्वच पर्यटकांना महागड्या हॉटेलमध्ये जेवणे परवडू शकत नाही, त्यामुळे ही सुविधा असल्यास त्यांच्या खाण्या पिण्याचा प्रश्न सुटू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT