Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: 'या' महत्वाकांक्षी योजनांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, पन्नास स्थानिक व्यावसायिकांना होणार लाभ

राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी गोवा होमस्टे ॲण्ड ब्रेकफास्ट योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism राज्य मंत्रिमंडळाने कारावान पर्यटन योजनेस मंजुरी देताना या कारणासाठी वाहन वापरकर्त्यांना वाहन कराचा परतावा देणे निश्चित केले आहे. राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी गोवा होमस्टे ॲण्ड ब्रेकफास्ट योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे.

पर्यटन खात्याने दोन महिन्यांपूर्वी 43 नव्या प्रकारच्या सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध केल्या जातील, असे जाहीर केले होते. त्यानंतर आता या दोन महत्वाकांक्षी योजनांना राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. कारवान योजनेत किमान पन्नास स्थानिक व्यावसायिक सहभागी होतील, अशी सरकारची अपेक्षा आहे.

त्यांच्या भांडवली गुंतवणुकीवर काही प्रमाणात सरकारी मदत करण्याची तयारीही सरकारने ठेवली आहे. तीन वर्षांसाठी ही योजना लागू असेल. त्यासाठी सरकारने पहिल्या वर्षी दोन कोटी रुपये, दुसऱ्या वर्षी ३ तर तिसऱ्या वर्षी ४ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत योजनांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

दुसऱ्या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. या बैठकीत १५ कोटी रुपये खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली आहे. ९ जलमार्गांवर तिसरी पाळी सुरू करण्याचेही ठरवण्यात आले आहे.

या जलमार्गांवर सध्या ३० फेरीबोट आहेत. तिसरी पाळी लागू करण्यासाठी १९ फेरीबोटींवर सरकार आपले कर्मचारी नेमेल तर उर्वरित फेरीबोटींवर खासगी क्षेत्राकडून वा अन्य संस्थेकडून कर्मचारी घेणार आहे. तसाही निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT