Goa vs Phuket hotel prices: भारताचे माजी G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी गोव्यातील पर्यटनाच्या वाढत्या खर्चावर आणि किचकट नियमावलीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. गोव्यातील चार-तारांकित (4-Star) हॉटेलचे भाडे थायलंडमधील 'फुकेट' किंवा व्हिएतनाममधील 'दा नांग' सारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
अमिताभ कांत यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करताना म्हटले की, पर्यटन हे रोजगार निर्मितीचे सर्वात मोठे साधन आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम होतो. मात्र, भारतातील, विशेषतः गोव्यातील 'ओव्हर-रेग्युलेशन'मुळे पर्यटनाचे कंबरडे मोडलेय.
अतिरिक्त नियम आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियांमुळे गोव्याचे पर्यटन आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकत नाही. सरकारने तातडीने अनावश्यक प्रक्रिया रद्द करून कार्यपद्धती सुटसुटीत करावी, अशी मागणी त्यांनी केलीये.
गेल्या काही काळापासून जेव्हा जेव्हा गोव्याच्या पर्यटनावर टीका होते, तेव्हा "गोव्याची तुलना थायलंडशी करू नका" असा बचाव केला जातो. मात्र, सध्या हडफडे येथील भीषण आग आणि बेकायदेशीर क्लबवर सुरू असलेली कारवाई, यांमुळे पर्यटनाच्या प्रतिमेला आधीच तडा गेला आहे. अशातच अमिताभ कांत यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाने ताशेरे ओढल्यामुळे, गोव्याला खरोखरच आत्मचिंतनाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.