Goa Tourism Goa business boom  Dainik Gomantak
गोवा

गोव्‍यातील व्‍यावसायिकांचे ‘अच्छेदिन’ सुरू

व्‍यवसाय तेजीत : किनारपट्टी परिसरात वाढतेय पर्यटकांची वर्दळ

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गेल्या वर्षी पर्यटन व्यवसाय (Goa Tourism) सुरू होऊन तो काही प्रमाणात बहरत असताना कोरोना (Covid) महामारीची दुसरी लाट सुरू झाल्‍याने सर्वकाही ठप्‍प झाले. परिणामी पर्यटन व्यवसायावर निर्भर असलेल्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. पण, आता कोरोना महामारी नियंत्रणात येऊ लागल्याने गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची (Tourists) संख्या वाढली आहे. दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर (Beach) मोठ्या प्रमाणात देशी पर्यटकांची गर्दी होत आहे, अशी माहिती गोवा शॅक मालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिली.

शॅक मालकांना 2019 मध्ये ज्याप्रमाणे कोरोना महामारीचा फटका बसला होता. तसा फटका बसू नये, यासाठी गेल्यावर्षी दक्षिण गोव्यात 60 टक्केच शॅक सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षी दिवाळी तसेच नववर्षाला मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात आले होते. पण, नंतर कोरोनाने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरवात केल्याने पर्यटन हंगाम संपण्यापूर्वी दक्षिण गोव्यातील शॅकमालकांनी सर्व शॅक बंद केली. यंदा गणेश चतुर्थीपासून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दिवाळीला मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येत आहे, असे क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले.

शुल्‍कमाफी करावी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात पडलेल्या शॅक मालकांच्या भल्यासाठी गोवा सरकारने भरावे लागणारे पर्यटक शुल्क 50 टक्क्‍यांनी माफ केले आहे. शॅक मालकांनी सुरवातीला पर्यटन शुल्कावर संपूर्ण सूट किंवा किमान 75 टक्के सूट देण्याची मागणी सरकार दरबारी करण्यात आली होती, परंतु, सरकारने माफ केलेले 50 टक्के शुल्क बरीच मदत करणार आहे. परंतु, गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीईएल) शुल्क सरकारने माफ केले नसून गोवा सरकारने हे शुल्क माफ करण्यासाठी मुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे, असे क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT