Goa Tourism| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याचे पर्यटन महाग का? पर्यटकांचा प्रश्‍न

Goa: गोव्यात दर्जेदार पर्यटक यावेत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना वाटत असले तरी परदेशी पाहुण्यांपेक्षा अधिक खर्च देशी पर्यटकच करतात.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: गोव्यातील पर्यटन महागडे आहे, ही पर्यटकांची ओरड वारंवार खरी ठरत आहे. नव्या मोपा विमानतळावरून बाणावलीच्या एका तारांकित हॉटेलपर्यंत पर्यटकाला विमान भाड्यापेक्षाही अधिक भाडे द्यावे लागले आहे. त्यामुळे दिवसभर टॅक्सी भाडे आकारलेली ही पावती समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली.

गोव्यात दर्जेदार पर्यटक यावेत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना वाटत असले तरी परदेशी पाहुण्यांपेक्षा अधिक खर्च देशी पर्यटकच करतात. अशा पर्यटकांना गोव्यात आल्यानंतर येणाऱ्या लुटमारीचा अनुभव पाहता, त्यांच्यात नक्कीच नाराजीचा सूर असेल.

परंतु विमान प्रवासाला जेवढे रुपये मोजावे लागले नसतील, त्यापेक्षा जास्त टॅक्सीला पैसे द्यावे लागत असतील तर प्रवासी डोक्यावर नक्कीच हात मारून घेत असावेत.

मोपा विमानतळावरून बाणावलीच्या मेरियॉट हॉटेलपर्यंतचा प्रवास साधारण 65 किलोमीटर अंतराचा. परंतु प्रवास भाडे साधारण 3,227 धरले तर विमानतळ भाडे, सेवा शुल्क आणि जीएसटी मिळून ही रक्कम 4 हजार 148,50 रुपयांवर पोहचली.

त्यावरून ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असा धक्कादायक प्रकार या पर्यटकांच्या बाबतीत घडला. याची चर्चा आज दिवसभर समाज माध्यमांवर सुरू होती.

मोपा विमानतळावरून बाणावलीपर्यंत येण्यासाठी टॅक्सीचे 4,148,50 रुपयांचे बिल म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असेच म्हणावे लागेल. या बिलात 484,07 रुपयांची सेवा फी आणि 160 रुपयांची एअरपोर्ट फी आकारली आहे.

हा प्रकार पाहता भाजप सरकार सामान्यांवर बोजा टाकून धनाढ्यांचे खिसे भरते आहे, असे वाटते. अशाने गोव्याचे पर्यटन रसातळाला जाणार, हे नक्की. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT