Dudhsagar Festivista Goa Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar Festivista: कुळेत रंगणार ‘दूधसागर फेस्ताविस्ता’! संगीत, संस्कृती आणि सण समारंभांचा अनोखा मिलाफ

Dudhsagar Festivista Kulem: कुळे येथील मेटावाडो मैदानावर येत्या २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘दूधसागर फेस्ताविस्ता’ एकदिवसीय उत्सव आयोजित केल्याची माहिती जीटीडीसीचे चेअरमन गणेश गावकर यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Dudhsagar Festivista 2024 Information

पणजी: गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) आणि पर्यटन विभागाने धारबांदोडा तालुक्यातील कुळे येथील मेटावाडो मैदानावर येत्या २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘दूधसागर फेस्ताविस्ता’ एकदिवसीय उत्सव आयोजित केल्याची माहिती जीटीडीसीचे चेअरमन गणेश गावकर यांनी केली. फेस्ताविस्ता या कार्यक्रमात संगीत, संस्कृती आणि सण समारंभाचा एक अनोखा मिलाफ यात असणार आहे.

पत्रकार परिषदेला पर्यटन संचालक सुनील अंचिपाका (आयएएस), जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गेविन डायस, उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर यांची उपस्थिती होती.

गावकर म्हणाले, ‘दुधसागर फेस्ताविस्ता‘मध्ये आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम, उत्कृष्ट स्थानिक कलाकुसर, कारागिरांचे स्टॉल आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स असणार आहेत. समुद्री किनाऱ्याच्या पलीकडचा नैसर्गिक गोवा पर्यटकांना दाखविण्याचा हा एक उपक्रम आहे. हा पहिलाच महोत्सव असून, या फेस्ताविस्ताचा संस्मरणीय अनुभव पर्यटकांना निश्‍चित येणार आहे.

पहिलाच महोत्सव!

अंचिपाका यांनी सांगितले, राज्यात असा महोत्सव पहिल्यांदाच होणार आहे. महोत्सवांतर्गत आम्ही पर्यटकांना या भागातील नैसर्गिक आकर्षणे दाखवणार आहोत. पर्यटन विभागाच्या ‘गोवा बियॉन्ड बीचेस'' उपक्रमावर या फेस्ताविस्तामुळे भर दिला जाणार आहे. दूधसागर फेस्ताविस्ता स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करेल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT