Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beaches: ५० किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी ९० कोटींची निविदा! साफसफाई बनला आहे कळीचा मुद्दा

Goa Tourism Department: सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी किनारा स्वच्छतेसाठी नवी एजन्सी स्थापन होण्याची शक्यता आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Beaches Cleaning

पणजी: पर्यटन खात्याने गोव्यातील ५० समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पुढील पाच वर्षांसाठी एकूण ९० कोटी रुपयांपेक्षा रकमेची निविदा काढली आहे. किनाऱ्यावरील साफसफाई हा कळीचा मुद्दा बनला आहे. स्वच्छतेचे कंत्राट दिलेल्या कंपनीला दिलेल्या मुदतवाढीच्या विषयावरून विरोधकांनी आवाज उठवला होता. दरम्यान, विधानसभेत नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नव्याने कंत्राट देण्यासाठी निविदा काढली जाईल, असे आश्‍वासन दिले होते.

संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छता सेवा प्रदान करण्यासाठी आता नव्याने एजन्सी नियुक्त करण्याचे पर्यटन खात्याने निश्‍चित केले आहे. सध्या किनाऱ्यांच्या स्वच्छतेची ज्यांच्याकडे निविदा आहे, तो वादाचा मुद्दा बनला होता. सरकारने शनिवारी याविषयीची निविदा काढली असून, कंत्राट मिळाल्यानंतर संबंधित एजन्सीला राज्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील ‘कचरा संकलन, विलगीकरण, वाहतूक आणि विल्हेवाट'' यासह विविध सेवा प्रदान करावी लागणार आहे.

पर्यटन विभागाने जारी केलेल्या निविदेत असे म्हटले आहे, की यशस्वी बोली लावणाऱ्याला कर्तव्ये पार पाडण्यासाठी पाच वर्षांचे कंत्राट दिले जाईल. ऑक्टोबर २०१९ मध्ये, विभागाने बंगळुरूस्थित कर्नाटक कमर्शिअल अँड इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन (केसीआयसी) प्रायव्हेट लिमिटेडला किनारे सफाईचे कंत्राट दिले गेले होते. केसीआयसीला गोव्यातील ३७ प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर समुद्रकिनारा-स्वच्छता सेवा पार पाडण्याचे काम देण्यात आले होते.

नवी एजन्सी स्थापण्याची शक्यता

जानेवारीत, शॅक मालकांसह काही संबंधित व्यावसायिकांनी किनारा सफाईचे मानांकन घसरले, असा आरोप केला होता. कचरा उचलणेबाबत कंत्राटदार अक्षम ठरल्याचे त्यांचे म्हणणे होते.सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी किनारा स्वच्छतेसाठी नवी एजन्सी स्थापन होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer: महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Sport: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT