Bicholim Dainik Gomantak
गोवा

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Breaking News Live Update: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या विविध क्षेत्रातील ठळक घडामोडी.

Pramod Yadav

डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग लावल्याप्रकरणी एकास अटक

मुळगाव-डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग लावल्या प्रकरणी डिचोली पोलिसांकडून एकाला अटक. पुढील तपास सुरू. सुत्रांच्या माहितीनुसार आग लावताना इसम मद्यधुंद अवस्थेत होता.

गोव्यात येत्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यात; IMD

गोव्यात पुढील आठवड्यात सोमवार आणि मंगळवार (२३, २४ सप्टेंबर) मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोवा हवामान खात्याने याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

गोवा आघाडीत बिघाडी? पाटकरांच्या 'त्या' विधानाला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरेंचाही पाठींबा!

आप आणि काँग्रेस, दोघांना आपआपली ताकद वाढविण्याचा पूर्ण अधिकार. जरी भविष्यात आघाडी झाली तरी जागा वाटपाचा अधिकार हा हायकमांडकडेच. त्यापूर्वी सर्व मतदारसंघात पक्षाची शक्ती असणं गरजेचं. तरच त्याचा दोघांना फायदा.

अमित पाटकरांचे सर्व मतदारसंघात काँग्रेस वाढविण्याबाबतचे विधान त्याच दृष्टीने असेल. त्यात काही चुकीचं नाही. काँग्रेस डेस्क इंचार्ज माणिकराव ठाकरेंनी गोमन्तक टीव्हीशी बोलताना केले प्रतिपादन.

कुंकळ्ळीतील दोन आस्थापनांना काम बंदची नोटीस

मोकळ्या जागेत सांडपाणी सोडल्याने गोवा राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कुंकळ्ळी आयडीसीतील मरीन प्रॉडोक्ट व क्वालीटी फूड या दोन आस्थापनांना काम बंदची नोटीस. 26 सप्टेंबरपर्यंत कार्यालयात उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे दिले आदेश.

गॅरेजमधील दुचाकींना अज्ञाताकडून आग; चार Bike जळून खाक, दोन लाखांचे नुकसान

दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये ठेवलेल्या दुचाकींना आग लावण्याची घटना उघडकीस आली आहे. मुळगाव येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेत चार दुचाकी जळाल्याने दोन लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे. तक्रारीनंतर पोलीस तपास सुरु.

गोव्यात एक ऑक्टोबरपासून 'एक साथ एक तास' स्वच्छता उपक्रम

मुख्यमंत्र्यांचे सर्व पंचायतींना स्वच्छता मोहीम करण्याचे आवाहन केले आहे. एक ऑक्टोबरपासून 'एक साथ एक तास' हा उपक्रम नगरपालिका आणि पंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबरपूर्वी घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जाईल.

Goa Accident: ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार

ओल्ड गोवा येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात विवेक कुमार (१७, ओल्ड गोवा) याचा उपचारादरम्यान मृत्यू. विवेकच्या भरधाव दुचाकीने ज्येष्ठ नागिकाला दिलेल्या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघांवर रुग्णालायात उपचार सुरु होते. दरम्यान, उपचारादरम्यान विवेकचा मृत्यू झाला आहे.

वाळपई म्हाऊस जंक्शनच्या मुख्य रस्त्यावर पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

वाळपई म्हाऊस जंक्शनच्या मुख्य रस्त्यावर पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया. दुरूस्ती काम करण्यासाठी कामगार हजर

गोव्यात पहिल्या ग्राम न्यायालयाचे उद्घाटन

गोव्यातील पहिल्या ग्राम न्यायालयाचे वाळपईत उद्घाटन करण्यात आले आहे. नागरिकांना गाव पातळीवरच न्याय मिळावा, यासाठी ग्राम न्यायालयाची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रतिपादन ग्राम न्यायालयाचे न्यायमूर्ती इरशाद आगा यांनी वाळपई येथे जिल्हा व सत्र न्यायालय उत्तर गोवा तर्फे ग्राम न्यायालयाचा उद्घाटन सोहळ्यात बोलताना केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT