Goa politics and crime updates Dainik Gomantak
गोवा

Goa News : ऑनलाइन राईड बुक करणाऱ्या एका ग्राहकाला शिवीगाळ

Goa News Live Updates In Marathi: गोव्यातील राजकारण, पर्यटन, गुन्हे, कला - क्रीडा - संस्कृती, अपघात यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी.

Pramod Yadav

ऑनलाइन राईड बुक करणाऱ्या एका ग्राहकाला शिवीगाळ

शनिवारी हरमल येथे ऑनलाइन राईड बुक करणाऱ्या एका ग्राहकाला घेण्यासाठी गोवा माइल्स टॅक्सी चालक गेला तेव्हा त्याला धमकावण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली.

अतिवृष्टीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

पाऊस शेतकऱ्यांसाठी जरी जीवनदायी असला तरी अतिवृष्टीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागते. ताळगाव येथील शेतकऱ्यांनी सांगितले की यावर्षी झालेल्या जास्त पावसामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.मध्ये मध्ये पडणाऱ्या पावसामुळे आमच्या पिकांची नासधूस झाली असे त्यांनी सांगितले.

रमा काणकोणकर हल्ला प्रकरण: जेनिटोचा जामीन अर्ज फेटाळला!

मर्सेसमधील विशेष न्यायालयाने रमा कानकोणकर हल्ला प्रकरणातील आरोपी जेनिटो कार्डोझोचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

मोटारसायकलची धडक बसून तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी

मोटारसायकलची धडक बसून तीन वर्षीय मुलगा गंभीर जखमी. डिचोलीतील मुस्लिमवाडा येथे अपघात. मूळ झांशी येथील जखमी मुलगा मजूर कुटुंबातील

मुंगुल हल्ला प्रकरणात आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

मडगाव जेएमएफसीने मुंगुल हल्ला प्रकरणात अटक केलेल्या २६ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली. पुढील सुनावणी १ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल.

चांदेल हसापूर पंचायत क्षेत्रात दिवाळीसाठी खास महिला ग्रुप महिलांचा बाजार

चांदेल हसापूर पंचायत क्षेत्रात दिवाळीसाठी खास महिला ग्रुप महिलांचा बाजार भरवण्यात आला. त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ याचे उद्घाटन आमदार प्रवीण आर्लेकर सरपंच बाळा शेटकर आदी उपस्थित होते.

रमा काणकोणकर हल्ला प्रकरण; सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

जेनिटो कार्डोझोसह रमा काणकोणकर हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जेनिटो कार्डोझो जामिनाचा आदेश आज दुपारी ४.३० वाजता येईल.

खरेदीसाठी पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी

आणखी दोन दिवसांत दिवाळी सण येणार असल्याने खरेदीसाठी पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. आकाशकंदीलांचे दर मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत ३०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत.दुकानदारांच्या म्हणण्यानुसार बाजारात बाहेरील राज्यांतील दुकाने मोठ्या प्रमाणात उभी राहिल्यामुळे स्थानिक गोमंतकीय दुकानदारांचे गिऱ्हाईक कमी झाले आहे.गेल्या २५ ते ५० वर्षांपासून व्यवसाय करणारे काही जुने दुकानदार सांगतात की मागील काही वर्षांप्रमाणे आता धंदा होत नाही, कारण बाहेरचे व्यापारी येऊन व्यवसाय करतात आणि त्यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत आढळली मिरची पूड

थंड पेयाच्या सीलबंद बाटलीत मिरची पूड आढळून आली, बाटलीत मिरची पूडची पाकिट सापडल्याने खळबळ निर्माण झाली. फोंड्यातील या घटनेवरुन स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

रासई-लोटली स्फोट! पोलिसांकडून सुरक्षा अधिकाऱ्याला अटक

रासई-लोटली येथे विजय मरीन शिपयार्डमध्ये जहाज बांधणीचे काम सुरू असताना अचानक आग लागून मोठा स्फोट झाल्याने दोघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य चार कामगार जखमी झाले. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी सुरक्षा अधिकाऱ्याला अटक केली आहे. या दुर्घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बांबोळीत Hit And Run! 14 वर्षीय मुलगा जखमी, पोलिसांकडून कार चालकाविरोधात गुन्हा

बांबोळीत हिट अँड रन प्रकरणात १४ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

कोलवा येथे भाडेकरु रुमच्या बाहेर ३८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खबबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल तपास सुरु केला. रात्री आलेल्या वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटात व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salaulim Dam Affected People: 40 वर्षांपासून प्रलंबित साळावली धरणग्रस्तांचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Russian Woman Viral Video: 'पाणीपुरी नको!' म्हणत रशियन महिलेनं फिरवली पाठ; पण भेळपुरीची चव चाखताच म्हणाली, Wow.... पाहा व्हिडिओ

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

SCROLL FOR NEXT