Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Goa Daily News Wrap: गोव्यात दिवसभरात घडलेल्या ठळक आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा, एका क्लिकवर

Pramod Yadav

मोपा विमानतळावर काम करणाऱ्या मजुराचा मृत्यू

Mopa Airport

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या नवल चौधरी (रा. झारखंड) या कामगाराच्या काम करताना मृत्यू , परिसरत संरक्षण भिंत व पायऱ्यांचे काम करत असताना वरच्या बाजूचा लोखंडी पाईप डोक्यावर पडून गंभीर जखमी झाला, उपचारासाठी नेत असताना मृत्यू.

दक्षिण गोव्याचा भाजप उमेदवार तिसऱ्या यादीत - तानावडे

दक्षिण गोव्याचा भाजप उमेदवार तिसऱ्या यादीत जाहीर केला जाईल. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती. उमेदवार घोषणेसाठी विलंब झाला म्हणून काही हरकत नाही दोन्ही जागा शंभर टक्के भाजपच जिंकणार. तानावडे यांचा विश्वास.

म्हापशात बनावट तृतीपंथीयांना पोलिसांकडून अटक, घरात घुसण्याचा प्रयत्न

Mapusa Crime News

हाउसिंग बोर्ड, म्हापसा येथे एका घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा बनावट तृतीपंथीयांना पोलिसांकडून अटक. चोप दिल्यानंतर जमावाने संशयितांना केले पोलिसांच्या स्वाधीन.

Mapusa Crime News

भाजपची दुसरी यादी जाहीर, दक्षिणेचा समावेश नाही!

भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीतही दक्षिण गोव्याचा उमेदवार जाहीर करण्यास भाजपला अपयश.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्य महोत्सव म्हणून साजरा करणार, गोवा सरकारचा निर्णय

Dr. Babasaheb Ambedkar

गोवा सरकारने मोठा निर्णय घेतला असून, दरवर्षी 14 एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे.

Dr. Babasaheb Ambedkar

गोवा ऍथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव परेश कामत यांचे निधन

गोवा ऑलिम्पिक संघटनेचे खजिनदार आणि गोवा ऍथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव परेश कामत यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गोव्याच्या क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

इच्छाशक्ती आणि समर्पणाने राष्ट्रीय खेळांच्या आयोजनात त्यांनी म्हत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीय पातळीवरील 100 मीटर तसेच 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी गोव्याचे प्रतिनिधीत्व केले.

Paresh Kamat

एसजीपीडीए येथील घाऊक मासळी बाजार तात्पुरता वेर्णा IDC येथे स्थलांतरित करण्याचा विचार

मडगाव घाऊक मासळी बाजाराचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासाठी घाऊक मासळी बाजार तात्पुरता वेर्णा औद्योगिक वसाहतीत नेणार असल्याची एसजीपीडीए अध्यक्ष तथा आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांची माहिती, घाऊक मासळी विक्रेते निर्णयावर नाराज.

राहुल गांधींसोबत खुली चर्चा करण्यास तयार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

CM Pramod Sawant

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवर टीका करत, खासदार राहुल गांधी यांच्याशी खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच, खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे आता वय झाल्याची टीप्पणी त्यांनी केली.

CM Pramod Sawant

मोले येथे महिलेने रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म

मोले येथे एका महिलेने रुग्णवाहिकेतच मुलाला दिला जन्म. कर्मचारी EMT पुंडलिक सुतार यांनी केली महिलेची प्रसूती. आई आणि नवजात बाळ सुरक्षित.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कर्मचारी पुंडलिक व रुग्णवाहिका चालक राजेश गावकर यांचे केले अभिनंदन .

रेंट अ कार, रेंट अ बाईकवाल्यांना आता घ्यावे लागणार अंडरटेकींग!

रेंट अ कार व रेंट अ बाईकमुळे राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभुमीवर आता वाहतूक पोलिसांकडून नवा नियम. रेंट अ कार व रेंट अ बाईकवाल्यांना चालकांकडून सही करुन घ्यावे लागणार अंडर टेकींग.

या अंडर टेकींगवर दारु न पिता गाडी चालवणे व इतर वाहतूक नियमांचा असेल उल्लेख. या अंडर टेकींगची एक प्रत चालकाकडे तर एक प्रत असले रेंट अ कार व रेंट अ बाईकच्या मालकाकडे असेल. वाहतूक अधिकक्ष राहूल गुप्तांची पत्रकार परिषदेत माहिती.

Goa Police

पणजी पालिका उद्यानात मृतावस्थेत सापडला भिक्षेकरी!

पणजी पालिका उद्यानात एक भिक्षेकरी मृतावस्थेत सापडला असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मद्याच्या नशेत खाली कोसळून डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा आंदाज‌ पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास सुरू.

Goa Crime News

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT