गोवा

Goa News: दिवसभरात गोव्यात कुठे काय घडलं? पडझडीसह इतर ठळक बातम्या

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

Manish Jadhav

 बांदोडा येथील घरावर कोसळले झाड!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नागेशी बांदोडा येथे रवींद्र नागेशकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून मोठे नुकसान. फोंडा अग्नीशाम दल घटनास्थळी दाखल.

Goa Belgavi Road: मुसळधार पावसामुळे चोर्ला मार्गे रस्ता खचला

गोवा बेळगाव (चोर्लामार्ग) हा रस्ता केरी येथे अंजुणे धरणाजवळ खचून कडा कोसळल्याने धोकादायक बनला आहे. तातडीने दुरुस्तीची गरज, अन्यथा मार्ग बंद होण्याची भिती.

Goa Mangalore National Highway: गोवा मंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी; प्रवाशांचे हाल!

कारवारपासून 10/15 कि.मी अंतरावर चेंडीये/ होसाळी येथे पाणी रस्त्यावर आल्याने हजारो वाहने काल रात्री पासून गोवा मंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अडकून पडली आहेत.

Fatorda: फातोर्ड्यात बंगल्या शेजारील संरक्षक भिंत कोसळली

मार्ले, फातोर्डा येथील बंगल्या शेजारील संरक्षक भिंत कोसळल्याने रायेश चेंबर्स 4 फ्लॅटचे नुकसान.

Sanquelim News: साखळीत अवतरले बाल विठ्ठल रखुमाई वारकरी

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विठ्ठलापूर साखळीत फर्स्ट स्टेप प्ले स्कुलच्या विद्यार्थ्यांनी वारी काढत विठू नामाच्या गजराने परिसर दणाणून सोडला.

Bicholim Accident: डिचोलीत अपघात; पाच विद्यार्थी किरकोळ जखमी

डिचोलीत अपघाताचे थांबायचं नाव घेत नाहीये. बगलमार्गावरील व्हाळशी जंक्शनवर आणखी एक अपघात झाला. दोन कारमध्ये धडक झाली, ज्यामध्ये पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

Goa Red Alert: राज्यात आज रेड अलर्ट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याकडून राज्यात आज (16 जुलै) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Anjunem Dam: अंजुणे धरणाचे चारही दरवाजे उघडले

केरीतील अंजुणे धरणाने 90 मीटरची पातळी ओलांडल्याने धरणाचे चारही दरवाजे खुले करुन पाणी सोडण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT