Goa Accident Case Dainik Gomantak
गोवा

Goa News: महासंचालकांच्या बदलीची शक्यता, पावसामुळे राज्यभर पडझड, अपघात; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 29 June 2024 Live News: आसगाव घर मोडतोड प्रकरण, गुन्हे, राजकारण यासह गोव्यातील ताज्या बातम्या.

Pramod Yadav

दिवाडी बेटावर अपुरी फेरी सेवा, लोक त्रस्त

दिवाडी बेटावरील अनियमीत आणि अपुऱ्या फेरी सेवेमुळे स्थानिक त्रस्त. वारंवार याबाबत तक्रारी आणि मागण्या करुनही संबंधीत खात्याचे दुर्लक्ष. परिस्थिती न सुधारल्यास लोकांचा मोर्चा नेण्याची तयारी.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी हात जोडून काय केले आवाहन?

कुडतरी मतदारसंघातील वीज समस्या सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत अहोरात्र काम करत आहे. मतदारसंघात 70 ते 75 कोटींच्या वीज कामांचे टेंडर झाले आहे. मी हात जोडून लोकांना आवाहन करतो की जिथे ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येतील त्यांना विरोध करु नका. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांचे हात जोडून आवाहन.

आमदार विजय सरदेसाईंचा वारीत सहभाग, वारकऱ्यांना दिल्या शुभेच्छा

"पंढरपूरच्या विठ्ठलाचें नांव गोड दर्शनाची ताच्या उपाट ओड वारकऱ्यांच्या वांगडा दोन पावलां तीच ताचे निस्सीम भक्तीची जोड"

Goa Accident Deaths: पोरस्कडे येथे ट्रक अपघात, उपचारादरम्यान ट्रकचालकाचा मृत्यू!

पोरस्कडे येथे भीषण अपघात. उपचारादरम्यान जखमी ट्रक चालकाचा मृत्यू. ट्रक चालक मूळ गुजरातचा असल्याची माहिती.

अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना!

अखिल गोवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना‌. साखळी रविंद्र भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आमदार डॉ.देविया राणे, ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभूदेसाईंचीही खास उपस्थिती.

Goa DGP: जसपाल सिंग यांच्या जागी ओमवीर? हालचालींना वेग

आसगाव घर मोडतोड प्रकरणी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्यावरील कथित आरोपानंतर सरकारमध्ये जोरादार हालचाली सुरू झाल्या आहेत.

सध्या परदेशात रजेवर असलेले पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग विष्णोई यांना ताबडतोब बोलवण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्याची शक्यता आहे.

Goa DGP: आसगाव घर मोडतोड प्रकरण डीजीपींच्या अंगलट!

डीजीपी जसपाल सिंग यांची बदली करावी, राज्य सरकारकडून केंद्राला अहवाल सादर.

स्कूटरच्या धडकेत विद्यार्थी जखमी, चालकाने काढला पळ

फर्मागुडी येथील जीव्हीएम सर्कलजवळ स्कूटरच्या धडकेत विद्यार्थी जखमी. स्कूटर चालकाने स्कूटर घेऊन काढला पळ.

आसगाव घर मोडतोड प्रकरण; पूजा शर्माला SIT चे समन्स

आसगाव येथील घर मोडतोड प्रकरणात मुंबई स्थित पूजा शर्मा हिला क्राईम ब्रँचच्या एसआयटीकडून येत्या 1 जुलै रोजी चौकशीस उपस्थित राहण्यासाठी समन्स. क्राईम ब्रँच अधीक्षक राहुल गुप्ता यांची माहिती.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे 'पर्सनल काउन्सिलींग' करावे!

१२वी नंतर विद्यार्थ्यांना करियर गायडन्सची सर्वात जास्त गरज. यासाठी शिक्षकांनी बारावीनंतर कुठच्या सेक्टरमध्ये जावे यावर पर्सनल काउन्सिलींग द्यावे, मुख्यमंत्र्यांचे शिक्षकांना आवाहन.

पर्यटन क्षेत्रात पुढील पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्या!

गोव्यातील पर्यटन क्षेत्रात पुढील पाच वर्षांत दोन लाख नोकऱ्यांची संधी‌. स्वयंपूर्ण गोवा मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व उच्च माध्यमीक विद्यालयांशी करियर गाईडन्सवर साधलेल्या संवादात मुख्यमंत्र्यांचा दावा.

पोरस्कडे येथे घरात घुसला ट्रक

पोरस्कडे येथे नाडकर्णी यांच्या घरात घुसला ट्रक. सुदैवाने घरा मधील सर्व सुखरूप बचवले. एक फोर व्हीलर आणि दोन टू व्हीलर आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान. चालक दारुच्या नशेत असल्याने झाला अपघात!

Crocodile died in train accident: तिखाजन-मये येथे रेल्वे रुळाजवळ मगरीचा बळी

तिखाजन-मये येथे रेल्वे रुळाजवळ मगरीचा बळी. मगरीचे दोन तुकडे. रेल्वेखाली चिरडल्याचा अंदाज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT