पुराचा धोका टाळण्यासाठी डिचोलीत पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना करणार. आमदारांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत निर्णय. जलस्रोत खात्याचे अधिकारी होते उपस्थित. सरकारला प्रस्ताव सादर करणार.
धारबांदोडा तालुक्यातील सावर्डे-कोडली रस्त्यावरुन ३०० मीटर अंतरावरील हे दृष्य. अनेक ठिकाणी डोंगरकापणी. डोंगरावर प्लॉटींग.
मुख्यमंत्र्यांनी सचिवालयात सर्व खात्यांचे सचिव तसेच आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. लोकांना योग्य वेळेत चांगल्या सुविधा देण्याबाबत तसेच साधनसुविधा प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत दिले निर्देश. केंद्राच्या योजना मार्गी लावण्यात विविध खात्यांची कामगिरीचा घेतला आढावा. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणा, सर्व सचिवांना दिला आदेश.
भूमिगत विज वाहिन्या घालण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून जांबोली येथील राजू भट याचा मृत्यू. ग्रामस्थांनी एकजुट दाखवुन कंत्राटदारकडे १५ लाख भरपाईची केली मागणी. अखेर १० लाख नुकसान भरपाई देण्यास कंत्राटदार तयार.
नाईकवाड, कळंगुट येथे सुरु असणाऱ्या जुगा अड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकत २४ जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून २.४० लाख रोकड आणि तीन लाख रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ताब्यात घेतलेल्या २४ जणांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
आमच्याकडे तब्बल ३३ आमदारांच संख्याबळ आहे मात्र All is not well. सरकारला अनेक विधेयकं मागे घ्यावी लागली. मंत्रीमंडळाने लोकांच्या हितासाठी विधेयके आणणे अपेक्षित आहे. मायकल लोबोंचा भाजपला घरचा आहेर.
संसदेचे अधिवेशन तहकूब झाल्याने गोव्यातील अनुसूचित जमातींसाठीच्या विधेयकाला विलंब. पुढील अधिवेशनात विधेयक मंजूर होईल, याबाबत मला आशा आहे. क्रीडा, कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांचा विश्वास.
राज्याच्या विविध भागात 48 नवी वाचनालये उभारणार. सध्याच्या 79 वाचनालयांत आवश्यक सुधारणा करणार. बुध्दी मिळवण्यासाठी मंदिरात रांगेत नव्हे वाचनालयाबाहेर रांगा लावण्याची गरज - मंत्री गोविंद गावडे
जांबोली मोले येथे भूमिगत वीज वाहिन्यांसाठीखोदलेल्या खड्ड्यात पडून राजू भट (60) यांचा मृत्यू. ठेकेदाराच्या बेजबाबदारमुळे अपघात घडल्याचा आरोप. संतप्त नागरिकांकडून संबंधित अधिकारी व कंत्राटदारला घटनास्थळी आणण्याची मागणी.
AICC मीडिया पॅनेलचे सदस्य अंशुमन सेल नेहरू यांच्याकडून विजय सरदेसाई यांच्या 'संडे डायलॉग' या संवाद कार्यक्रमाचे कौतुक. गोव्यातील सामान्य लोकांसाठी आवाज उठवणे आणि 2027 मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी INDIA Alliance एकत्र काम करेल. अंशुमन यांची सोशल मीडिया एक्सवर पोस्ट.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.