Goa TMC Trojan demello Dainik Gomantak
गोवा

Goa TMC : सरकारने रोजगार धोरण आखण्याची तृणमूल काँग्रेसची मागणी

तरुणांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यात सरकार अपयशी ठरल्याचाही ट्रोजन डिमेलोंचा आरोप

दैनिक गोमन्तक

Goa TMC : राज्‍यातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पदवीधर युवक बेरोजगार आहेत. नोकरी नाही आणि रोजगार नाही, अशी युवकांची अवस्‍था झाली आहे. सरकारने यासाठी रोजगार धोरण आखावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी केली. पक्षाच्‍या कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मारियानो रॉड्रिग्‍स आणि प्रतिभा बोरकर उपस्‍थित होत्‍या. राज्यसभेचे खासदार लुईझिन फालेरो यांनी गोव्यातील बेरोजगारीवर संसदेत प्रश्‍न उपस्‍थित केला होता. राज्‍याने बेरोजगारीचा उच्चांक गाठला असून संसदेत हे उघड झाले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्‍या उत्तरानुसार गोव्याचा बेरोजगारीचा दर 10.5 टक्के आहे. राष्ट्रीय बेरोजगारीचे प्रमाण 4.2 टक्‍के आहे. याचाच अर्थ देशाच्‍या तुलनेत राज्‍यातील बेरोजगारीचा दर दुप्पट आहे. सीआयएमईच्या अहवालानुसार, गोव्याचा बेरोजगारीचा दर जानेवारीमध्ये 11.6 टक्‍के हेाता. जुलैमध्ये तो 13.7 टक्‍के होता, असे डिमेलो म्‍हणाले.

मुख्यमंत्र्यांनी फोडले शिक्षकांवर खापर

गोमंतकीय युवकांना नोकरी हमी देण्याच्या स्थितीत सरकार आता राहिलेले नाही. शिक्षकांनाच दोष देऊन मुख्यमंत्री मोकळे झाले आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी शिक्षकांना बळीचा बकरा बनवले जात आहे. तरुणांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा टोला डिमेलो यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Hypoglycemia: काय आहे हाइपोग्लायसेमिया? रक्तातील साखर अचानक कमी होणं ठरु शकतं जीवघेणं; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

SCROLL FOR NEXT