trojan dmello Dainik Gomantak
गोवा

मतदारांना खूश करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा गुजरातला

विधानसभा निवडणुकीनिमित्त आमिष दाखवल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्‍यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा गुजरातला नेण्यामागे मोठे राजकारण आहे. गुजरात विधानसभेच्‍या निवडणुका तोंडावर आल्‍या आहेत. या पार्श्वभूमीवर मतदारांना खूष करण्यासाठी या स्‍पर्धा गोव्‍यातून गुजरात राज्‍यात हलविल्‍याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांनी केला. पक्षाच्‍या येथील कार्यालयात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोअर कमिटीच्‍या सदस्य अविता बांदोडकर आणि प्रतिभा बोरकर उपस्‍थित होत्‍या.

राज्‍यात होऊ घातलेल्‍या राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा गोव्‍याबाहेर जाणे, हे भाजप सरकारसाठी लज्जास्‍पद आहे. गेली दहा वर्षे राज्‍यात भाजपचे सरकार आहे. या स्‍पर्धा 2008 साली होणार होत्‍या. दर दोन वर्षांनी होणाऱ्या स्‍पर्धा घेण्यास राज्‍य सरकारने विलंब केल्‍याने पाच राष्ट्रीय स्‍पर्धांना क्रीडापटू मुकले आहेत, असे बांदोडकर म्‍हणाल्‍या. स्‍पर्धा वेळेत न घेतल्‍याबद्दल राज्‍य सरकारला यापूर्वी एकदा 10 कोटी आणि एकदा 14 कोटी रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

मुख्यमंत्र्यांचे अनोखे कॅसिनोप्रेम

भाजप सरकार कॅसिनोवर आकारला जाणारा जीएसटी कमी करण्याचा प्रयत्‍न करत आहे. खरे तर सरकारने औषधे आणि रुग्णालयातील खाटांवरील जीएसटी पूर्ण माफ करायला हवा. पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कॅसिनोवरील जीएसटी कमी करण्यासाठी ताकद पणाला लावत आहेत. राज्‍यात अद्याप गेमिंग कमिशनरची नियुक्ती झालेली नाही, हे आश्‍चर्यकारक असल्‍याचे डिमेलो म्‍हणाले.

प्रमुख गोव्याचे, तरीही अपयश

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गोवा ऑलिम्पिक संघटनेचे प्रमुख आहेत. तरीही राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा गुजरातला गेल्‍या. गोवा सरकारने गुजरातच्‍या निवडणुकांसाठी राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धांचा मान त्‍यांना दिला असून यात राज्‍य सरकारचे अपयश आहे, असे डिमेलो म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT