Goa: There was big argument for trivial reasons Dainik Gomantak
गोवा

Goa: क्षुल्लक कारणासाठी काढली तलवार

शाब्दीक बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या वादात झाले, तलवारीने केले वार

दैनिक गोमन्तक

शिवोली: घरच्या टेरेसवरील पावसाचे पाणी पिंपात (बॅरल) भरत असताना शेजारच्या प्रसाद सिमेपुरुषकर कुटुंबीयांशी झालेल्या शाब्दीक बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या वादात झाले. त्यानंतर अनिता सिमेपुरुषकर आणि शैलेश सिमपुरुषकर या दाम्पत्यावर हल्लेखोरांनी तलवारीने वार केले. यात शैलेश जखमी झाले. हल्ला करणारे प्रसाद सिमेपुरुषकर, त्यांचा पुत्र विनीत आणि जवळचा नातेवाईक हे तिघेही फरार असल्याची माहिती हणजुण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अमित तरल यांनी दिली. अनिता सिमेपुरुषकर यांनी पोलिस स्थानकात रितसर लेखी तक्रार दाखल केली आहे.

क्षुल्लक कारणांवरून उद्भवलेल्या भांडणाचे पर्यवसान शैलेश सिमेपुरुषकर यांच्यावर प्राणघातक हल्ल्यात झाले. ही घटना सोमवारी गुडे -शिवोलीत घडली. येथील श्री काळोबा मंदिर परिसरात वास्तव्य करून राहाणाऱ्या अनिता शैलेश सिमेपुरुषकर या सोमवारी सकाळी आपल्याघरच्या टेरेसवरील पावसाचे पाणी पिंपात भरत होत्या.

तेव्हा शेजारच्या प्रसाद सिमेपुरुषकर कुटुंबीयांशी त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान अनिता सिमेपुरुषकर या पती शैलेश सिमेपुरुषकर यांच्यासमवेत कारने म्हापसा येथे जाण्यास निघाल्या होत्या. गुडेतीलच प्रसाद सिमेपुरुषकर व अन्य तिघांनी त्यांची गाडी अडवली आणि शैलेश सिमेपुरुषकर यांच्या डोक्यावर तलवारीने सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्‍यात शैलेश जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT