चोरीचे प्रतीकात्मक चित्र  Dainik Gomantak
गोवा

धारगळ येथे घरात साडे चार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी 

घरमालक हॉस्पिटलात गेले असता घडला चोरीचा प्रकार

Dainik Gomantak

Goa: वशालबाग धारगळ (Dhargalim) येथील विराज सखाराम पटेकर यांच्या घरातुन सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन (Jewelry theft) नेल्याची तक्रार पेडणे पोलीस ठाण्यात देण्यात आलेली आहे. तक्रारदार विराज पटेकर हे 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता हॉस्पिटलात गेले होते व दुपारी 12 वाजल्यानंतर घरी परतले असता त्याना घराचे मागील दार उघडे दिसले. त्यानंतर कपाटा जवळच ठेवलेल्या कपाटाच्या चाव्यांनी कपाट उघडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला (Theft) गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या दागिन्यामध्ये मंगळसूत्र, पाटली व अन्य सोन्याचे दागिने असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारी नंतर पेडणे पोलीसांनी ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांनी तपास सुरु केला. श्वान पथकही आणून चोरी प्रकरणी शोध घेण्याचा प्रयत्न झाला. अद्याप पोलीस तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyanka Patil Ruled Out: टीम इंडियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे श्रेयंका पाटील टी-20 विश्वचषकातून बाहेर, कोणाची होणार एन्ट्री?

Sattari water Isuue: दूषित पाणीप्रकरणी आयोग सक्रिय; सत्तरीत स्वतःहून चौकशी, संबंधित विभागांना नोटीस

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT