Robbery at Khandola Ganesha Temple Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : खांडोळा गणेश मंदिरात चोरी; लाखोंची मालमत्ता लंपास

सीसीटीव्ही यंत्रणा निकामी, पोलिस तपास सुरू

दैनिक गोमन्तक

संजय घुग्रेटकर

खांडोळा : येथील प्राचीन श्री गणेश मंदिरावर मध्यरात्री दरोडा खालून मंदिरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मूर्तींची प्रभावळ, मुकुट, हात, एका पायाचे पाऊल, अक्षयपात्र, सूर्य, चंद्र प्रतिमा, रथाचे काही साहित्याही घेऊन चोरट्ये पसार झाले. ही घटना मध्यरात्री घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 5 ते 10 लाखांची मालमत्ता चोरी झाल्याची शक्यता आहे.

चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या कड्या तोडल्या असून आतील सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केली. त्यानंतर त्यांनी मंदिरातील मौल्यवान सोने, चांदीचे दागिणे व इतर मूर्तींचे सजावट साहित्यांची चोरी केली. मंदिराचा संग्राह्य रुम (स्टोररूम) फोडून तेथील बरेच साहित्य उचलले असून काही साहित्य मंदिराच्या बाहेर फेकून दिले.

चोरट्यांना मुख्य दरवाजा फोडून ते आत गेले असून बाहेर पडताना दुसरा दरवाजा तोडून बाहेर आले. उत्तरेकडील दरवाजातून ते बाहेर पडले असून उत्तरेकडील फाटकाजवळ दोन कळशा, चौरंग आणि काही साहित्य, फंड पेटीतील रक्कम टाकून चोरटे पसार झाल्याचे प्रथम दर्शन स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी पोलिस तपासणी सुरू असून वरिष्ठ पोलिस अधिकारी सी. एल. पाटील, विजयकुमार चोडणकर, सुरज काणकोणकर, नितेश काणकोणकर इतर पोलिस ज्ञानेश्वर च्यारी, अवधूत चोडणकर, महेश गोवेकर, जितेंद्र गावडे यावेळी उपस्थित होते. सकाळी श्वानपथकाद्वारे तपास सुरू केला.

पोलिस गस्त हवी

विस्तारणाऱ्या माशेल-खांडोळ्यात पोलिसांची गस्त हवी. माशेलात पोलिस चौकी असूनही त्यांचा विशेष उपयोग होत नाही. रात्रीच्या वेळी कुठेही गस्त दिसत नाही. त्यामुळे अशा चोरट्यांना संधी मिळते. एखादी चोरी झाली तरच गस्त सुरू केली जाते, त्यानंतर कुठेही पोलिसांची गस्त नसते. किमान रात्रीच्या वेळी माशेल-खांडोळा परिसरात पोलिसगस्त असणे गरजेचे आहे, असे मत आपचे नेते नोनू नाईक यांनी व्यक्त केले.

Robbery at Khandola Ganesha Temple Goa

देवदेवतांची भूमी

माशेल पंचक्रोशी म्हणजे देवदेवतांची भूमी आहे. या भूमीत जवळ जवळ पन्नास लहान मोठी मंदिरे आहे. या मंदिरातून मौल्यवान मूर्ती, दागिणे व इतर साहित्य आहे. माशेलात सोनारांची आस्थापने, बॅंका, सहकारी सोसायट्या आहेत. या ठिकाणाचे रक्षण करण्यासाठी पोलिस व जनतेने सतर्क होण्याची गरज आहे, असेही मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT