अनिकेत दड्डीकर व निलय नाईक यांची संकल्पना, कथा व दिग्दर्शन लाभलेल्या "दर्या देगेर" या गाण्याच्या व्हिडिओला गोव्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa: 'दर्या देगेर' गाण्याच्या व्हिडिओला लाभतो  उत्तम प्रतिसाद

गोव्याबाहेरील संगीत प्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभत असून केवळ पाच दिवसांत 15 हजार पेक्षा जास्त लोकांनी या गाण्याचे व्हिडिओ फेसबुक, यु-ट्युब, इन्स्टाग्राम माध्यमातुन पाहिला आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : विजू नाईक (Viju Naik) यांनी निर्मिती केलेल्या, अनिकेत दड्डीकर (Aniket Daddikar) व निलय नाईक (Nilay Naik) यांची संकल्पना, कथा व दिग्दर्शन लाभलेल्या "दर्या देगेर" ("Darya Deger" Video song) या गाण्याच्या व्हिडिओला गोव्यात (Goa) व गोव्याबाहेरील संगीत प्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभत असून केवळ पाच दिवसांत 15 हजार पेक्षा जास्त लोकांनी या गाण्याचे व्हिडिओ फेसबुक, यु-ट्युब, इन्स्टाग्राम माध्यमातुन पाहिला आहे. शिवाय अनेक नामवंत कलाकारांनी या व्हिडिओचे कौतुक केले आहे.

हे गाणे निलय नाईक यांच्या अधिकृत यु-ट्युबवरुन प्रदर्शित झाले असुन. "दर्या देगेर बसुन तुजी सपना हांव पळयता, सगळे दीस तुजी वाट हाव पळयतां`` असे ह्या गाण्याचे बोल आहेत.

अनिकेत दड्डीकर यांनी स्वता हे गाणे गायिले असुन त्यानेच ते संगीतबद्ध केले आहे. या गाण्यात उधेश व तन्वी वेर्णेकर यांच्या प्रमुख भुमिका असुन समिक्षा पै धुंगट, हरीष मोहनदास बोरकर, अंकिता बोरकर, अविता बोरकर, प्रियांका पाटील, प्रतिक पाटील, बहादुर खान, विघ्नेश भांडारी, जोईलन बापतिस्त व संदीप वारक यांच्या सहभुमिका आहेत.

सिनेमाटोग्राफी सुमित राज, स्वप्निल नाईक, शुभम बोरकर यांनी केले असुन व्हिडिओ संपादन स्वप्निल नाईक यांनी केले आहे.

या व्हिडिओला गोव्यातील अनेक दिग्गज संगीत कलाकारांतर्फे कौतुक होत आहे. यात डॉ. पुर्णानंदच्यारी, साईश पै पाणंदीकर यांचा व अनेकांचा समावेश आहे.

गोव्याची प्रतिभाशाली शास्त्रीय गायिका शकुंतला भरणे हिने सांगितले की हे गीत कोकणी संगीताच्या विस्ताराच्या दृष्टिने महत्वपुर्ण असुन त्यात कोकणी मातीचा गंध लाभल्याने हे गीत व व्हिडिओ प्रथमदर्शनीच मनाला भावणारा आहे. प्रेम म्हणजे काय व त्या प्रेमाचा गंध या गाण्यामार्फत दाखविण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे भरणे यांनी म्हटले आहे. ही एक सुंदर कलाकृती  असल्याचे प्रिया कालिका बापट हिने म्हटले आहे. या गाण्याचे बोल अप्रतिम असल्याचा अभिप्राय गायिका बिंदिया वस्त नाईक हिने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT