Goa : Vejitable in Horticulture. Dainik Gomantak
गोवा

Goa : ‘फलोत्‍पादन’च्‍या भाज्‍याही महागल्‍या

पाऊस, पुराचा फटका : भेंडी, गाजर, चिटकीचे दर कडाडले (Goa)

Mahesh Tandel

पणजी : गेले दोन आठवडाभरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतीसह भाजीपाल्‍याचीही (Vejitables) प्रचंड हानी (Loss) झाली आहे. परिणामी पुन्हा एकदा भाज्यांचे दर सर्वसामान्‍यांच्‍या आवाक्‍याबाहेरचे झाले आहेत. फलोत्पादन महामंडळाकडून उपलब्ध केल्या जाणाऱ्या काही भाज्यांचे दरही वाढल्याचे दिसून येत आहे. यात भेंडी, गाजर आणि चिटकी यांचा समावेश आहे, तर वालपापडी, फ्लॉवर यांच्या दरामध्ये घसरण झाली आहे.

कांदा, कोबीचा दर स्‍थिर
कोबीचा दर प्रति किलो २२ रु. असा स्थिर आहे. कॉलिफ्लॉवरचा दर प्रति नग ३६ रुपये होता, तो ६ रुपयांनी कमी होऊन ३० रुपये झाला आहे. तर वालपापडीच्या दरामध्ये बदल झालेला असून प्रति किलो ५५ रुपयांवरून दर ४६ रुपयांवर आलेला आहे. हिरवी मिरची २८ वरून घसरून प्रति किलो २२ रुपये या भावाने विकली जात आहे. कांद्यात जास्त फरक पडलेला नसून ३२ रु. प्रति किलो असा त्याचा दर होता. त्यात एका रुपयाने वाढ होऊन कांदा ३३ रुपये दराने विकला जात आहे. त्याचप्रमाणे बटाटा आणि टोमॅटो यांच्या भावात फरक दिसून आलेला आहे. बटाट्याचा भाव प्रति किलो २४ रुपये असा होता, तो आता २७ रुपये प्रति किलो झाला आहे. तर टोमॅटोचा दर २६ रुपयांवरून वाढून २८ रुपये प्रति किलो असा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT