Goa: स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी. बी. कुन्हा स्मारकाला मुख्यमंत्री डॉ. सावंत पुष्पचक्र अर्पण करताना  Dainik Gomantak
गोवा

Goa: स्वातंत्र्यसैनिक डॉ. टी. बी. कुन्हा यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

गोवा मुक्तीलढा चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी. बी. कुन्हा यांची पुण्यतिथी

Dainik Gomantak

Goa: गोवा मुक्तीलढा चळवळीतील (Goa Liberation) तसेच पोर्तुगीजांच्या वसाहती नियमांविरुद्ध भूमिका बजावण्यात अग्रेसर असलेले स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी. बी. कुन्ह यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Dr T B Kunha Death Anniversary Day) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी पणजीतील आझाद मैदानावरील (Azad Maidan) स्मारकाला पुष्पचक्र अर्पून श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्यसैनिकांचा आदर्श व त्यांची आठवण भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असेल असे मत त्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

स्वातंत्र्यसैनिक डॉ. टी. बी. कुन्हा यांनी गोवा मुक्तिलढ्यातील कार्य महान आहे. मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांची आठवण सदोदित स्मरणात ठेवण्यासाठी त्याचे कार्यक्रम आयोजित केले जातील. पोर्तुगीज वसाहती नियमांविरुद्ध लढणारे कुन्हा हे पहिले गोमंतकिय होते. त्यांचा आदर्श भावी पिढीच्या मनात रुजवण्यासाठी त्यांची आठवण देणे गरजेचे आहे. आज त्यांच्या स्मारकाला श्रद्धांजली वाहनाता माझे ऊर भरून आले. त्यानी केलेल्या लढ्यामुळे तसेच त्यागामुळे आम्ही आज ही फळे उपभोगत आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले.

पणजीतील आझाद मैदानावरील डॉ. टी. बी. कुन्हा स्मारकाला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलिस बँडच्या मदतीने सलामी देण्यात आली. यावेळी पोलिस महासंचालस मुकेश कुमार मीणा तसेच महानिरीक्षक राजेश कुमार हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT