Goa temperature  Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात तापमानात वाढ मात्र थंडीचा जोर कमीच!

पुढील चार-पाच दिवसांत किमान तापमानात अजून 1 ते 2 अंशांनी वाढ होणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: राज्यात तापमानात वाढ होत असून थंडी थोडीशी कमी होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाल्याने रात्रीदेखील उकाड्याचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागत असून पंखा किंवा एसी लावल्याशिवाय झोपही लागणे कठीण होत आहे.

पुढील चार-पाच दिवसांत किमान तापमानात अजून 1 ते 2 अंशांनी वाढ होणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात उष्म्याचा अनुभव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरी भागात तर हिवाळा सुरू आहे, असे जाणवतदेखील नाही.

पुढील चार-पाच दिवस राज्यातील तापमान कोरडे राहणार असून, काही भागात सकाळी धुके दाटण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे. आज पणजी येथे कमाल 31.6 अंश सेल्सिअस तर किमान 20.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्यातील परतीच्या पावसाला उशीर झाला. त्यानंतर मान्सुनोत्तर कालखंडात पावसाची बरसात झाली. त्यामुळे यंदा थंडीला उशिरा सुरुवात झाली. मात्र, नंतर मंडूस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे थंडी कमी झाली आणि अजूनदेखील राज्यात म्हणावी तशी थंडी पडलेली नाही.

राज्यातील गेल्या 50 वर्षांतील हिवाळी तापमानाचा विचार करता सर्वाधिक उष्ण हिवाळा हा 2019 सालचा होता. गेल्या दोन वर्षांत हिवाळ्यात सामान्य तापमान होते. यंदादेखील तसे सामान्य तापमानच आहे.

राज्यात सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात सर्वाधिक थंडीची म्हणजेच कमी तापमानाची नोंद होते. डिसेंबर मध्यानंतर तापमान कमी होऊन जानेवारीतच नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता येत.- एम. राहुल, वैज्ञानिक, गोवा वेधशाळा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT