Goa Teacher Recruitment 2021

 

Dainik Gomantak

गोवा

Goa Teacher Recruitment 2021: प्राथमिक शिक्षक पदांसाठी मागवले अर्ज

गोवा शिक्षण संचालनालय (Goa Education Board) यांनी प्राथमिक शिक्षक पदासाठी अर्ज मागविले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Teacher Recruitment 2021: गोवा शिक्षण संचालनालय (Goa Education Board) यांनी प्राथमिक शिक्षक (Teachers) पदासाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार 17 डिसेंबर 2021 पर्यंत education.goa.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. एकूण 142 रिक्त पदांच्या भरतीसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करावा. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, नियमानुसार केलेला अर्जच वैध मानला जाणार आहे.

रिक्त पदांची संख्या

सामान्य वर्ग – 50

ओबीसी- 29

एसटी – 40

ईडब्ल्यूएस – 14

सीएफएफ – 7

एससी- 2

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 2 वर्षांचा एलीमेंट्री एजुकेशन डिप्लोमा असणे आवश्यक आहे. अधिक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षाची सुट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल.

महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा

अर्ज सुरू होण्याची तारीख - 2 डिसेंबर 2021,

अर्जाची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2021

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT