Goa Taxi  Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi चालकांची सरकारविरोधात ‘गांधीगिरी’

2 ऑक्टोबरपासून गोवा टॅक्सीचालकांची पदयात्रा

दैनिक गोमन्तक

पणजी: सरकारकडून (Goa Government) टॅक्सीचालकांची (Goa Taxi) थट्टा सुरू असल्याचा आरोप करीत या सरकारला धडा शिकविणार आहोत. गांधी जयंतीपासून (2 ऑक्टोबर) (Gandhi Jayanti) उत्तर गोव्यातील सर्व मतदार संघात पदयात्रा काढून सरकारच्या भानगडी सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार असल्याची माहिती संघटनेचे सचीव सुदीप ताम्हणकर (Sudip Tamhankar) यांनी काल दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी टॅक्सींना फुकट मीटर बसवून देण्याची घोषणा केली होती. टॅक्सीचालक मीटर बसविण्यासाठी गेल्यानंतर त्‍यांना तसा लेखी आदेश नसल्‍याचे सांगून बोळवण करण्यात येत आहे. आधीच मीटर नसल्याच्या कारणास्तव टॅक्सीचालकांच्या सर्व सुविधा स्थगीत करण्यात आल्या आहेत. परमीटदेखील दिले जात नाही. त्याशिवाय गोवा माईल्सच्या माध्यमातूनही अन्याय सुरूच आहे. एकंदर सरकार टॅक्सीचालकांची क्रूर थट्टा करीत आहे, असे ताम्हणकर म्हणाले.

गांधी मार्गाने आंदोलन

टॅक्सीचालक संघटनेची काल शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत सरकारच्या विरोधात महात्मा गांधींच्या धोरणाने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 ऑक्टोबरपासून पदयात्रा काढण्यात येणार आहे. पहिल्या फेरीत उत्तर गोव्यातील सर्व मतदार संघात ही पदयात्रा काढली जाणार असून यावेळी नागरिकांमध्ये सरकारच्‍या अपयशी धोरणांबाबत जागृती केली जाणार असल्याची माहिती ताम्हणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT