goa Taleigao Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Taleigao Gram Sabha : ताळगाव ग्रामपंचायतीचे २२ कोटी २७ लाखांचे अंदाजपत्रक ; ग्रामसभेत सादर

Taleigao Gram Sabha : ‘ओडशेल’मधील अतिक्रमणाची पाहणी करण्याचे सरपंचांचे आश्‍वासन

गोमन्तक डिजिटल टीम

Taleigao Gram Sabha :

पणजी, ताळगाव ग्रामपंचातीतर्फे रविवारी झालेल्या ग्रामसभेत सरपंच जानू रुझारिओ यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर केले.

१५ कोटी ४४ लाख ५५ हजार रुपये खर्चाचे आणि ६ कोटी ८३ लाख ११ हजार २११ रुपये शिलकीचे असे एकूण २२ कोटी २७ लाख ६६ हजार २११ रुपयांचे अंदाजपत्रक सभेत मांडण्यात आले.

सरपंच रुझारिओ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला उपसरपंच रेगा पै, सचिव गौरीश पेडणेकर, सदस्य आग्नेलो फर्नांडिस, सिडनी बार्रेटो, रघुवीर कुंक्कळकर, संतोष चोपडेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सचिव पेडणेकर यांनी अंदाजपत्रकांचे वाचन केले.

याप्रसंगी काही उपस्थित नागरिकांनी प्रस्तावित अंदाजपत्रकातील खर्चावर बोट ठेवले. त्यावर हा प्रस्तावित खर्च दाखविलेला आहे, पंचायतीची निवडणूक झाल्यानंतर नवे मंडळ आपले अंदाजपत्रक सादर करेल, असे सरपंचांनी स्पष्टीकरण दिले.

या बैठकीत उपस्थित नागरिकांच्यावतीने सिसील रॉड्रिग्स यांनी ओडशेल भागात झालेल्या अतिक्रमणाविषयी ऑगस्ट २०२२ मध्ये आपण पंचायतीकडे लेखी तक्रार दिली होती. सभागृहाने अद्यापि याविषयी संयुक्त तपासणी केलेली नाही. पंचायत मंडळाने आपणास याविषयी १५ दिवसांत संयुक्त तपासणी करण्याचे आश्‍वासन द्यावे, अशी मागणी केली. ही मागणी सरपंचांनी मंजूर केले.

खासगी बसधारकांचा प्रश्‍न?

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ताळगाव परिसरातही इलेक्ट्रिक बसेसे धावणार आहेत. त्यामुळे ताळगाव परिसरात राहणाऱ्या खासगी बसचालकांनी आपल्या बसेस चालवाच्या कशा? पंचायतीने यात लक्ष घालून आमदारांच्या मार्फत त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली.

यावर सर्व बसमालकांनी पंचायतीकडे लेखी निवेदन द्यावे, तो विषय आमदारांच्या मार्फत सरकारकडे मांडला जाईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही आश्‍वासन सरपंच रुझारिओ यांनी दिले.

सांतिनेज खाडीकडे दुर्लक्ष नको

झेव्हियर आल्मेदा यांनी सांतिनेज खाडीचा प्रश्‍न मांडला. या खाडीत सांडपाणी, गटाराचे पाणी सोडले जात आहे.

दरवर्षी पंचायतीकडून खाडीची स्वच्छता केली जात असली तरी ती पुनर्जीवित करण्यासाठी पंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना केली. त्यावर सदस्य आग्नेलो यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीअंतर्गत खाडीच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारली जात आहे. अनेक ठिकाणी खाडीत येणारे सांडपाणी बंद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT