Arohi Borde Goa Swimming Dainik Gomantak
गोवा

Arohi Borde: गोव्याच्या 'आरोही'चा गुजरातमध्ये डंका! राष्ट्रीय जलतरणात पटकावले ब्राँझ; नावावर केला अनोखा विक्रम

Goa Swimming: गोव्याची प्रतिभाशाली युवा जलतरणपटू आरोही बोर्डे हिने गोमंतकीय जलतरणात मैलाचा दगड गाठताना ५१व्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत गुरुवारी ब्राँझपदक जिंकले.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याची प्रतिभाशाली युवा जलतरणपटू आरोही बोर्डे हिने गोमंतकीय जलतरणात मैलाचा दगड गाठताना ५१व्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत गुरुवारी ब्राँझपदक जिंकले. गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या या स्पर्धेत तिने २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला, फक्त ००.२४ सेकंद फरकाने तिला रौप्यपदक हुकले.

आरोही हिचे वडील नीलेश बोर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जलतरण महासंघाच्या स्पर्धांत २०० मीटर बटरफ्लायमध्ये पदक जिंकणारी आरोही पहिली गोमंतकीय जलतरणपटू ठरली आहे. जलतरणात ही शर्यत अतिशय कठीण मानली जाते.

एकंदरीत तिचे ही राष्ट्रीय पातळीवरील एकंदरीत तिसरे पदक आहे. गतवर्षी तिला राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत बटरफ्लाय स्ट्रोकमध्येच प्रत्येकी एक सुवर्ण व रौप्यपदक मिळाले होते.

अहमदाबाद येथील स्पर्धेत मुलींच्या गट दोनमधील २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत बंगालच्या सनिथी मुखर्जी हिने २ मिनिटे ३१.६५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या क्रमांकासाठी आसामची अंगरिका सैकिया व आरोही यांच्यात जोरदार चुरस राहिली. अंगरिका हिने २ मिनिटे ३३.४१ सेकंद वेळेसह रौप्य, तर आरोही हिने २ मिनिटे ३३.६५ सेकंद वेळेसह ब्राँझपदक मिळविले. भारतीय जलतरण महासंघाच्या (एसएफआय) स्पर्धेतील आरोहीचे हे पहिलेच पदक ठरले.

आरोही ही पेडे-म्हापसा येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्ट केंद्राची जलतरण प्रशिक्षणार्थी असून तिला प्रशिक्षक टी. ए. सुजीत यांचे मार्गदर्शन लाभते. ती शारदा मंदिर स्कूलची विद्यार्थिनी असून इयत्ता नववीत शिकते.

गोव्याची ‘बटरफ्लाय क्वीन’

राष्ट्रीय पातळीवरील वैयक्तिक तिन्ही पदके आरोही बोर्डे हिने बटरफ्लाय स्ट्रोक प्रकारात पटकावली आहेत. गतवर्षी राजकोट येथे झालेल्या ६८व्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत तिने २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण, तर १०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक जिंकले होते. आता ५१व्या राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धेत ती २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत ब्राँझपदकाची मानकरी ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT