Traffic Issue Dainik Gomantak
गोवा

Sunburn In Goa 2023: मोरजी, वागातोर, पर्वरीमध्ये चक्काजाम; वाहतूक कोंडीने स्थानिकांसह पर्यटकही हैराण

Sunburn In Goa 2023: गोव्यात सनबर्न उत्सवानिमित्त पर्यटकांची धूम; नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाची लाट

Ganeshprasad Gogate

Sunburn In Goa 2023: गोव्यात सध्या सनबर्न म्युझिक इव्हेंट सुरु असून नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक मंडळी गोव्यात दाखल झाली आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी अभिनेते, उद्योजक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय व्यक्तींबरोबरच देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

राज्यात नववर्षाच्या स्वागताची पर्यटकांची धूम शनिवारी संध्याकाळपासूनच सुरु झालेली पाहायला मिळत होती.

पणजी, म्हापसा, पर्वरी सारख्या किनाऱ्यालगतच्या शहरांमध्ये शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांतून अनेक वाहने गोव्यात दाखल झाली आहेत.

तसेच राज्यात काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने स्थानिक तसेच पर्यटकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

शनिवारी संध्याकाळ पासून किनारी भागातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात दिसून आली. विशेषतः सनबर्नला जाणाऱ्या वागातोर रस्त्यावर तर तर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

तसेच किनाऱ्या लगतच्या कळंगुट, बागा, मोरजी, हरमल, शिवोली, आश्वे सारख्या रस्त्यांवर २-२ तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस जागोजागी तैनात असूनही वाहतुकीचा बोजवारा उडालेला पाहायला मिळाला.

पर्यटनस्थळे गजबजली

गोवा राज्यातील विविध समुद्रकिनारे, हॉटेल्ससहित रिव्हर क्रुज, तसेच कॅसिनो जहाजांवरही पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. मद्याच्या दुकानांवरदेखील खरेदीसाठी झुंबड दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पर्यटनस्थळे गजबजलेली आहेत. पार्ट्या, मोठ-मोठ्या मेजवान्यांचे आयोजन नववर्ष स्वागतासाठी होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT