Goa summer wildfires Dainik Gomantak
गोवा

Goa Wildfire: राज्यात गवत, वनक्षेत्र आगीच्या 717 घटना! अग्निशमन दलाची माहिती; वन्यजीव मृत्यूबाबतचा अहवाल अजून प्रलंबित

Goa summer wildfires: पर्यावरणाची हानी रोखताना आगीत वन्यजीवाचा मृत्यू झाला आहे मात्र त्याचा अहवाल वन खात्याने अजूनही जाहीर केलेला नाही.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात उन्हाळ्यात सुक्या गवताला तसेच वनक्षेत्रात आगी लागण्याच्या घटना वारंवार घडतच असतात. काहीवेळा आगीवर नियंत्रण ठेवताना अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीशी झुंज देण्याची वेळ येते. पर्यावरणाची हानी रोखताना आगीत वन्यजीवाचा मृत्यू झाला आहे मात्र त्याचा अहवाल वन खात्याने अजूनही जाहीर केलेला नाही.

यावर्षी अग्निशमन दलाकडे आतापर्यंत नोंद झालेल्या सुमारे ३५०० कॉल्सपैकी २५ टक्के कॉल्स हे आगीचेच असून त्यातील ७१७ कॉल्स हे गवताला व वनक्षेत्राला आग लागण्याचे आहेत. गेल्यावर्षी वर्षभरात गवत व वनक्षेत्रात आगी लागण्याचे १४२१ कॉल्स नोंद झाले होते.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुक्या गवताला आग लागण्याची ही नैसर्गिक किंवा मानवी असू शकतात. काहीवेळा धूम्रपान करणारे जळकी सिगारेट किंवा विडी टाकून जातात मात्र तीच गवतामध्ये धुमसून नंतर पेट घेऊन आग लागते.

बादलीने पाणी मारण्याची वेळ...

हल्लीच ताळगाव येथील पडीक जमिनीतील सुक्या गवताला आग लागून शेजारी असलेल्या निवासी संकुलातील लोकांना धोका निर्माण झाला होता. ही आग विझविण्यासाठी दलाकडे पाण्याचे बंब पोहचतील इतके लांब पाईप नसल्याने बादलीने पाणी मारण्याची वेळ आली. दलाकडे ड्रोनच्या सहाय्याने पाणी मारण्याची अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे, मात्र काही अंतरापर्यंत सीमित आहे.

मागील वर्षी ८,९४८ कॉल्स

गेल्यावर्षी अग्निशमन दलाकडे मदतीसाठी ८९४८ विविध प्रकारचे कॉल्स आले होते. त्यापैकी २५२४ कॉल्स ही आगीचे होते. सुमारे २५ टक्के कॉल्स हे आगीचे होते. आगीत एकाचाही बळी गेला नाही, मात्र ९ जणांचे जीव वाचविण्यात दलाला यश आले होते. गवताला आग लागून तसेच वनक्षेत्रातील आगीमुळे मृत्यू झालेल्या वन्यजीव प्राण्यांचा अहवाल वन खात्याकडून जारी केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT