Sugarcane farm  Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: गोव्यातील ऊस उत्पादकांचा सरकारकडून विश्वासघात

विजय सरदेसाई : ...म्हणून इथेनॉल प्रकल्प मार्गी लागण्यास दिरंगाई

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: संजीवनी साखर कारखान्याच्या जमिनीवर सरकारमधील काही प्रॉपर्टी डिलरांचा डोळा असल्यानेच येथे होऊ घातलेला इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यास दिरंगाई केली. तसेच गोव्यातील ऊस उत्पादकांचा सरकारकडून विश्वासघात झाल्याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज केला.

ऊस उत्पादकांना सरकारने देऊ केलेली नुकसान भरपाई त्यांना योग्य प्रकारे दिली जात नाही अशी तक्रार घेऊन काही ऊस उत्पादक आज सरदेसाई यांना ‘गोंयकार घर’मध्ये भेटायला आले होते.

त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्यावर यावर आपण विधानसभा अधिवेशनात आवाज उठवू असे आश्वासन त्यांनी या उत्पादकांना दिले.

या उत्पादकांच्या प्रश्र्नाबद्दल सरदेसाई म्हणाले, सुरवातीला सरकारने त्यांना पाच वर्षांत इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येणार असे आश्वासन देताना तोपर्यंत या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.

यासाठी कमाल उत्पादन ग्राह्य धरून ही नुकसान भरपाई दिली जाणार असे सांगितले होते. मात्र, त्यात आता बदल करून जेवढे पीक घेतले आहे, तेवढीच नुकसान भरपाई देण्यात येणार असे म्हटले आहे. हा बदल म्हणजे सरकारने शेतकऱ्यांप्रती केलेला विश्वासघात आहे.

या शेतकऱ्यांना भाऊसाहेब बांदोडकर यांनी शेती उत्पादनाकडून ऊस उत्पादनाकडे येण्यास प्रोत्साहित केले होते. आता हे सरकार त्यांचा विश्वासघात करत आहे. त्यामुळे भविष्यात गोव्यात ऊस उत्पादक राहतील की नाही याची शाश्वती नाही, असे सरदेसाई म्हणाले.

‘विधानसभेत आवाज उठवणार’

येत्या विधानसभा अधिवेशनात आम्ही ऊस उत्पादकांसह अनेक प्रश्नांना वाचा फोडू असे सांगत हे सरकार आम्हाला त्यासाठीच घाबरते आणि त्यामुळेच अधिवेशनाचे दिवस सरकारने कमी केले आहेत, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला.

‘शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

शेतकऱ्यांचे प्रतिनिधी गुरुदास गाड यांनी सरकारी धोरणामुळे गोव्यातील ऊस उत्पादक नुकसानीत आलेला असून या शेतकऱ्यांना सरकारने आधी ठरविल्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. सरकारच्या धोरणामुळे ऊस उत्पादक अडचणीत आला आहे.

त्यामुळे सरकारने त्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी व इथेनॉल प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT