Goa Agitation : गोमेकॉच्या परिसरातील विक्रेत्यांचा ‘ठिय्या’, मुख्यमंत्र्यांना इशारा Dainik Gomantak
गोवा

गोमेकॉच्या परिसरातील विक्रेत्यांचा ‘ठिय्या’, मुख्यमंत्र्यांना इशारा

आठ दिवसांत आमच्या समस्येचा सोक्षमोक्ष न लावल्‍यास तीव्र आंदोलन छेडण्याचा मुख्यमंत्र्याना इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी: गोमेकॉच्या परिसरातील फळ आणि इतर विक्रेत्यांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन आरंभले आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याचे गाळे आणि गाडे जबरदस्तीने अचानकपणे हटविण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन करण्याचे अश्‍वासन वारंवार मुख्यमंत्री देत आहेत, मात्र ते हवेत विरले असल्याने आम्ही ठिय्‍या आंदोलन आरंभले, असल्याची माहिती विक्रेते संदीप चोडणकर यांनी दिली. आठ दिवसांत आमच्या समस्येचा सोक्षमोक्ष न लावल्‍यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्‍यांनी दिला.

दोन महिन्यांपूर्वी गोमेकॉसमोरील गाळे पाडण्यात आले, तसेच गाडे हटविण्यात आले होते. त्याविरोधात विक्रेत्यांनी अनेकवेळा आंदोलन केले; मात्र त्याची दखल घेतली गेलेली नाही. मुख्यमंत्री सावंत यांनीही विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याची ग्‍वाही दिली होती. पण, त्याचे हे अश्‍वासन हवेत विरल्याचा विक्रेत्यांचा आरोप आहे. त्यासाठी सोमवारपासून गोमेकॉसमोरच्या झाडाखाली विक्रेत्‍यांनी शांततापूर्ण आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्री केवळ आश्‍वासन देत आहेत.

प्रत्यक्षात कार्यवाही केली जात नसल्याने या विक्रेत्यांना आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला आहे. गेल्या तीन दिवसांत सरकारचा कुणीही प्रतिनिधी या ठिकाणी फिरकलेला नाही. आठ दिवसांत या समस्येचा सोक्षमोक्ष न लावल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

- स्वाती केरकर, कामगार नेत्या

‘गोमेकॉ’समोरील गाडे आणि गाळे हटविल्‍यानंतर सरकारने विक्रेत्‍यांचे पुनर्वसन करावयास हवे होते, ती सरकारची जबाबदारी आहे. सध्या या विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याला जबाबदार कोण? सरकारनी तात्‍काळ या विक्रेत्यांचे पुनर्वसन करावे.

- डॉनमिक परेरा,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT