Stray cattle cause an accident in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Stray Cattle Issue : गोव्यात भटक्या गुरांच्या समस्येत वाढ; हळर्णकर यांचे नागरी संस्थांना आवाहन

Goa Stray Cattle Issue : पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी शनिवारी नागरी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या गुरांची वैयक्तिक जबाबदारी घेण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

Goa Stray Cattle Issue : गोव्यात जवळपास प्रत्येक भागात रस्त्यावर असलेल्या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. ही समस्या अनेक महिन्यांपासून वाहनचालकांना आणि रहदारीसाठी बाधा ठरत आहे. ही समस्या लक्षात घेत, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी शनिवारी नागरी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या गुरांची वैयक्तिक जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. (Goa Stray Cattle Issue )

पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनाशी संबंधित योजनांबाबत संवाद साधताना, हळर्णकर म्हणाले, 'सरकारने स्थानिक नागरी संस्थांना रस्त्यावरून भटकी गुरे पकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील गोठ्यात ठेवण्याचे अधिकार दिले आहेत. तथापि, सर्व पंचायती आणि नगरपालिका या योजनेचा सक्रियपणे वापर करत नाहीत. यामुळे याचा नाहक त्रास रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना आणि वाहनचालकांना होत आहे.'

ते पुढे म्हणाले, मी पंचायतींना आवाहन करतो, विशेषत: ज्या ठिकाणी भटक्या गुरांची संख्या जास्त आहे, त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा किंवा भटक्या जनावरांच्या बचाव आणि व्यवस्थापनात गुंतलेल्या पशु स्वयंसेवी संस्थांसोबत सामंजस्य करार करावा.

रस्त्यांवरील भटक्या गुरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गोवा भटकी जनावरे व्यवस्थापन योजना, 2013 जाहीर करण्यात आली. योजनेनुसार, भटक्या गुरांना पकडण्यासाठी एजन्सी नेमून त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबईत रंगला 'गली क्रिकेट'चा थरार! प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटनला क्रिकेटच्या देवाने दिले फलंदाजीचे धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

Goa Water Crisis: 'जल है तो कल है'! यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे गोव्यात पाणीटंचाईचे गडद संकट

SCROLL FOR NEXT