CM Pramod Sawant Gomantak Digital Team
गोवा

Goa Statehood Day 2023 : प्रगती आणि विकासाचा संकल्प : मुख्यमंत्री

गोवा ही निसर्गसौंदर्य आणि उबदार मनाच्या लोकांची भूमी आहे. राज्य अनेक क्षेत्रात भारताच्या विकासाचा मार्ग समृद्ध करीत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्यांनी योगदान दिले, त्या सर्व नेते, विचारवंतांचे मौलिक कार्य महत्त्वाचे आहे. गोव्याला ‘स्वयंपूर्ण’ बनविण्याचा आणि सर्व क्षेत्रांत स्वावलंबी पद्धतीने प्रगती आणि विकास साधण्याचा आपण संकल्प करूया. 1967 मध्ये ओपिनियन पोलने घटक राज्य प्रवासास सुरुवात झाली. ज्याने गोवा हे वेगळे राज्य म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

30 मे हा गोव्याच्या गौरवशाली राजकीय इतिहासातील एक संस्मरणीय दिवस आहे, याच दिनी 1987 मध्ये गोवा हे भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले होते. हा दिवस गोमंतकीयांनी आपली ओळख जपण्यासाठी केलेल्या संघर्षाचा परिणाम आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

सावंत पुढे म्हणतात, गोवा ही निसर्गसौंदर्य आणि उबदार मनाच्या लोकांची भूमी आहे. राज्य अनेक क्षेत्रात भारताच्या विकासाचा मार्ग समृद्ध करीत आहे. राज्य संधींनी परिपूर्ण आहे आणि त्याची सर्व दिशांनी भरभराट होत आहे. लोकांचे समर्पण आणि योगदान यामुळेच गोव्याला राज्य सरकारद्वारे सुरू केलेले आणि राबविण्यात येत असलेले विविध विकासात्मक प्रकल्प आणि कार्यक्रम साध्य करणे शक्य झाले आहे.

गोंयकारपण टिकवा

गोव्यात अवाढव्य आर्थिक घडामोडी, गुंतवणुकीच्या क्षेत्रात बिगर गोमंतकीय अग्रेसर असलेले दिसत आहेत. गेल्या काही वर्षात गोवेकर गोव्यात कमी दिसत असल्याचे कारण म्हणजे गोव्यात रोजगार आणि प्रशिक्षण हे गोवेकरांच्या प्रतिकूल आहेत. गोवेकरांना गरजेचे आणि अनुकूल प्रशिक्षण लाभल्यास ते फायदेशीर ठरेल. आज गोव्याचे गोंयकारपण टिकवून ठेवण्याची गरज आहे.

सबिना मार्टिन, सदस्य, बायलांचो साद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT