Dainik Gomantak Dainik Gomantak
गोवा

Sports University Goa : गोव्यात क्रीडा विद्यापीठ होणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री.

B.PEd आणि M.PEd शिक्षणसोबतच प्रत्येक खेळासाठी लागणाऱ्या सपोर्ट स्टाफसाठी असणारे डिप्लोमा व डिग्री कोर्स देखील विद्यापीठात असणे आवश्यक आहे.

Vinayak Samant

राज्यात ३७ व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर ला होणार असून मंडगावच्या फातोर्डा फुटबॉल स्टेडियमवर त्याची जय्यत तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत जातीने स्वतः सर्व गोष्टींवर नजर ठेऊन आहेत.

याच धर्तीवर गोव्यातील खेळाडूंनी राज्यात क्रीडा विद्यापीठाची मागणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत कांपाल येथे चालू असलेल्या जलतरण तलावाची या इंडोर स्टेडियम ची पाहणी करणीय करीत आले होते त्यावेळी त्यांनी याबद्दल पत्रकरांना माहिती दिली.

गोव्यामध्ये वेगवेगळ्या खाजगी विद्यापीठे येतात त्याचप्रमाणे एखादे क्रीडा विद्यापीठ यावे ही माझी इच्छा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ३७ व्या राष्ट्रीय खेळानंतर कदाचित एखादे विद्यापीठ गोव्यात येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

गोव्यामध्ये खूप युवा वर्ग आहेत जे विविध खेळांमध्ये स्वतःचे करिअर करण्यासाठी इच्छुक आहेत. जर एखादे क्रीडा विद्यापीठ आल्यास त्या निमित्ताने त्यांच्यासोबतच देश विदेशातील युवा क्रीडा प्रशिक्षणासाठी गोव्यात येतील.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशभरातील युवांना स्पोर्ट्समध्ये करिअर करण्याचे आवाहन केले आहे. जर कुणी गोव्यात क्रीडा विद्यापीठ उभारण्याचा विचार करीत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो व त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

B.Ped आणि M.Ped सोबतच प्रत्येक खेळासाठी लागणाऱ्या सपोर्ट स्टाफसाठीच्या डिप्लोमा आणि डिग्री कोर्स ठेवण्याची गरज आहे. यासाठी आपल्याकडे काही संस्थांनी संपर्क केला असून त्यांना रीतसर प्रस्ताव देण्यास आपण सांगितले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

SCROLL FOR NEXT