Gi Tag For Goa Products Dainik Gomantak
गोवा

GI Tag: गोव्यातील 6 वस्तूंना लवकरच ‘जीआय’ मानांकन; ताळगावची वांगी, कोरगुट तांदूळ, आंबा, काजू बोंडूचा समावेश

GI Tag Goa: राज्यातील कोरगुट तांदूळ, मुसराद आणि मांगेलाल आंबा, करवंटी कोरीव कला, ताळगावची वांगी आणि काजू बोंडू या सहा वस्तू लवकरच ‘जीआय’ मानांकन प्राप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

Sameer Panditrao

Goa State GI Recognition

पणजी: राज्यातील कोरगुट तांदूळ, मुसराद आणि मांगेलाल आंबा, करवंटी कोरीव कला, ताळगावची वांगी आणि काजू बोंडू या सहा वस्तू लवकरच ‘जीआय’ मानांकन प्राप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या संबधीचे अर्ज स्वीकारले गेले आहेत. केवळ याला आता मंजुरी मिळणे बाकी असल्याने सहाही वस्तूंना लवकरच जीआय मानांकन मिळेल, असे विज्ञान-तंत्रज्ञान मंडळाचे अधिकारी दीपक परब यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी राज्यातील खाेला मिरची, हरमल मिरची, काजू फेणी, मंडोळी केळी, खाजे, मानकुराद, गोवा काजू, आगशीचे वांगे, सातशिरा भेंडी, बेबिंका आदी वस्तूंना यापूर्वी जीआय मानांकन देऊन गौरविण्यात आले आहे.

‘जीआय’चे होतील लाभ

एखाद्या वस्तूचे उत्पादन एका विशिष्ट प्रदेशात घेतले जात असल्याचे त्या वस्तुला भौगोलिक सूचकांक मानांकन(जीआय) मानांकन देण्यात येते. कोणत्याही उत्पादन किंवा वस्तूला जीआय मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते तसेच उत्पादनाची गुणवत्ता तसेच नफा कायम ठेवण्यासाठी त्याचा फायदा उत्पादकांना होतो. जीआय मानांकनामुळे उत्पादकाला अनेक अधिकार प्राप्त होतात. भेसळयुक्त उत्पादन, वस्तूची बनविणे किंवा तिची विक्री करणे याला एकप्रकारे आळा घालण्यास देखील मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT