ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: चिंता नको! एसटी राजकीय आरक्षण मिळणारच; मुख्‍यमंत्री सावंत यांचा पुनरुच्‍चार

2027 पूर्वी पूर्तता!! : धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्यांची गय नाही; तरुणांनी रोजगाराभिमुख व्हावे

गोमन्तक डिजिटल टीम

ST Reservation: आगामी 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्‍यातील अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळेल. त्‍यासाठी मी स्‍वत: आग्रही असून, केंद्राकडे सातत्‍याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘एडिटर टेक’ या कार्यक्रमात शुक्रवारी संपादक-संचालक राजू नायक यांनी मुख्यमंत्री सावंत यांची मुलाखत घेतली. विधानसभा अधिवेशन, रोजगारापासून नागरी समस्‍यांच्‍या प्रश्‍‍नांवर मुख्‍यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरे दिली.

2026 च्‍या जनगणनेनंतर मतदारसंघ फेररचना होईल. त्यानंतरच गोव्यात एसटींना राजकीय आरक्षण मिळेल, अशा आशयाचे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पत्र मिळाले आहे. त्‍या पार्श्वभूमीवर विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर मुख्‍यमंत्री म्‍हणाले, २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते;

पण कोरोनामुळे ती झाली नाही. मात्र,आरक्षणासाठी आम्ही खासगी ठराव घेतले, केंद्र सरकारकडे स्वतः पाठपुरावा करीत आहोत. आज व्‍हायरल होणारे पत्र जुनेच आहे, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

सुभाष वेलिंगकर यांनी गतवर्षी सेन्‍ट फ्रान्सिस झेवियर विषयक केलेले विधान व हल्‍लीच फादर बोलमॅक्स परेरा यांनी शिवरायांबद्दल केलेले वक्तव्य तसेच सांकवाळच्या एका भग्नअवस्थेत असलेल्या चर्चच्या ठिकाणी देवीची मूर्ती आणून ठेवली जाते अशा घटना घडतात, तेव्हा राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो, या प्रश्‍नावर मुख्‍यमंत्री म्‍हणाले, ‘गोवामुक्‍तीसाठी हिंदू आणि ख्रिश्‍चन एकत्रितरीत्या लढले. धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

मुख्‍यमंत्री उवाच...

  • रोजगार संधींसंदर्भात तरुणांनी सकारात्‍मक राहावे

  • आदरातिथ्‍य क्षेत्रात नव्‍या एक लाख रोजगार संधी

  • कायदेशीर वाळू सुरू करणार, प्रक्रिया प्रगतिपथावर

  • वास्‍कोत नियंत्रित कोळसा हाताळणी, सरकारचे लक्ष

  • खाण लिलावात पारदर्शकता, नियमनाद्वारेच वाटचाल

निःसंदिग्ध ग्‍वाही : राज्‍यात पुरातन मंदिरांचे अवशेष असलेल्‍या जागी पुनर्बांधणी केली जाईल; परंतु कोणत्‍याही चर्चिस वा अन्‍य धर्मियांच्‍या उभ्या वास्तूला धक्‍का पोहोचविला जाणार नाही, अशीही निःसंदिग्ध ग्‍वाही मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी एका प्रश्‍‍नावर दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT