ST Reservation 
गोवा

ST Reservation: गोव्यात एसटी राजकीय आरक्षणाचा चेंडू निवडणूक आयोगाकडे; सरकारची सर्व प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांचा दावा

Scheduled Tribe Reservation: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राजकीय आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे राज्य सरकारने पूर्ण केली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राजकीय आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे राज्य सरकारने पूर्ण केली आहेत. आता हा विषय निवडणूक आयोगाकडे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज स्पष्ट केले.

आरक्षणासंदर्भात अनिश्‍चिततेचे वातावरण निर्माण झाले असताना आता निवडणूक आयोगाच्या हालचालींकडे लक्ष लागून राहिले आहे. एसटी समाजाच्या नेत्यांनी बुधवारी मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन आरक्षणासंदर्भातील प्रलंबित वैधानिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच, ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी सरकारला अल्टिमेटमही दिला होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्‍यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी राजकीय आरक्षणाचा निर्णय न झाल्यास त्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर येणार का, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातीला (एसटी) राजकीय आरक्षण देण्‍यास विलंब होत असल्‍याचे मंत्री तवडकर व आमदार गावडे यांनी मान्‍य केले.

पण, येत्‍या विधानसभा निवडणुकीपर्यंत सरकार एसटींना आरक्षण मिळवून देईल, असा विश्‍‍वासही त्‍यांनी व्‍यक्त केला. राज्‍यातील आदिवासी समाज गेल्‍या २३ वर्षांपासून हक्कांसाठी रस्‍त्‍यावर उतरत आहे. रस्‍त्‍यावर आल्‍याशिवाय या समाजाला काहीच मिळत नाही, असे गोविंद गावडे म्हणाले.

एसटी समाजाला आरक्षण देण्‍याची प्रक्रिया सरकार पातळीवरून संथगतीने सुरू होती. त्‍यामुळेच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले विशेष कार्याधिकारी (ओएसडी) उपेंद्र जोशी यांनाही या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

- रमेश तवडकर, मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cancer Medicines Price Reduction: कॅन्सर रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय! औषधं मिळणार अत्यंत स्वस्त दरात, किमती 70 टक्क्यांपर्यंत कमी होणार

Bus Accident: प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळली; 6 जणांचा मृत्यू, 32 जण जखमी Watch Video

AI Policy 2026: गोव्याच्या 'एआय' धोरणासाठी 250 कोटी; 50 शाळांत प्रयोगशाळा, 50 हजार तरुणांना प्रशिक्षण

Horoscope: शुक्रवार 'या' 3 राशींसाठी भाग्यशाली! आर्थिक प्रगतीचे संकेत, रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता; मात्र निर्णय घेताना घाई नको!

IND vs NZ T20: अभिषेक-सॅमसन जोडीचा धमाका! रोहित-राहुलचा मोडला 6 वर्ष जुना रेकॉर्ड; न्यूझीलंडमध्ये रचला नवा कीर्तिमान

SCROLL FOR NEXT