Goa SSC Result Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Result: 'सरकारी माध्यमिक विद्यालय वाळपई' चा शंभर टक्के निकाल

पूनम इंगळे (Poonam Ingle) ही विद्यार्थिनी 80.68 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली.

दैनिक गोमन्तक

गुळेली: सरकारी माध्यमिक विद्यालय वाळपई (Government Secondary School Walpai) या विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. पूनम इंगळे (Poonam Ingle) ही विद्यार्थिनी 80.68 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. भाग्यश्वरी राठोड ही विद्यार्थिनी 77.59 टक्के गुण मिळवून द्वितीय आली तर हर्षल गावस (Hershal Gavas) यांनी 75.89 टक्के गुण प्राप्त करून तृतीय येण्याचा मान मिळवला.

यंदा या विद्यालयातून एकूण 33 विद्यार्थी शालान्त परीक्षेला बसले होते. त्यापैकी 3 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 9 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 18 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 3 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री देविदास कोटकर,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक-शिक्षक संघ व वाळपई परिसरातील लोकांकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

Middle East War: "युद्ध तुम्ही लादलं, खर्चही तुम्हीच द्या''! युएईची अमेरिकेला थेट तंबी; डॉलर सोडून चिनी 'युआन'कडे वळण्याचा दिला इशारा

Indian Football League: आघाडी घेतल्यानंतर धेंपो क्लब पराभूत, राजस्थान युनायटेडचा पिछाडीवरून 2-1 असा झुंझार विजय

SCROLL FOR NEXT