Goa SSC Exam 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Exam 2025: हुश्‍श..! पहिला पेपर संपला; पुढच्या पेपरसाठी विद्यार्थी सज्ज

Goa Education: दहावीचा पहिला पेपर प्रथम भाषा मराठी आणि इंग्रजीचा होता.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून वर्षभर रात्रंदिवस अभ्यास केला होता, त्या परीक्षेला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर धाकधूक आणि उत्साह देखील पाहायला मिळत होता.

पहिला पेपर प्रथम भाषा मराठी आणि इंग्रजीचा होता. पहिलाच दिवस असल्याने परीक्षा केंद्रात आपली आसन व्यवस्था व इतर बाबींची माहिती जाणण्यासाठी सकाळी ९ च्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

परीक्षा केंद्रात पहिला पेपर दिल्यानंतर प्रश्‍नपत्रिका पुन्हा न्याहाळात आपल्या इतर मित्रांशी चर्चाकरत विद्यार्थी बाहेर पडत असताना पहिला पेपर संपल्याचा आनंद आणि उत्तरे योग्य लिहिली आहे की नाही, याबाबत साशंकता देखील दिसून येत होती.

एकंदरीत पहिला पेपर संपल्यामुळे कही अंशी परीक्षेचा ताण कमी झाल्याचे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

गोवा शालान्त मंडळाद्वारे आयोजित दहावीच्या शालान्त परीक्षेचा दुसरा पेपर सोमवार ३ मार्च रोजी होणार असून द्वितीय भाषा हिंदीचा पेपर असणार आहे. दुपारी तापमानाचा पारा ३६. ४ अंशांवर गेला होता.

सरासरी तापमानाच्या तुलनेत ४ अंशांनी अधिक असल्याने काही प्रमाणात परीक्षेनंतर घरी परताना मोठ्या उष्म्याचा फटका विद्यार्थी तसेच आलेल्या पालकांनाही बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honeymoon Destinations: गोव्याच्या किनाऱ्यावर रोमान्स, दुबईची 'लक्झरी' लाईफ! हनिमूनला जाण्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 10 'रोमँटिक' ठिकाणं, कपल्सची आहे पहिली पसंती

Salim Ali Bird Sanctuary: नद्या खाड्यांनी वेढलेले 'चोडण' बेट, समृद्ध कांदळवन आणि मांडवीतील 'सलीम अली पक्षी अभयारण्य'

Iranian Fisherman: खोल समुद्रात इंजिन पडले बंद, इराणी मच्छीमाराला भारतीय नौदलाकडून जीवदान; गोमेकॉत उपचार सुरु

Goa Fishing: 'आम्ही खायचे काय'? गोव्यातले पारंपरिक मच्छिमार संकटात; खराब हवामानाचा मासेमारीला फटका

लग्नाचे वचन दिले, घरात बोलणी सुरु झाली पण 'तो' शरीराची भूक भागवून पसार झाला; गोव्यात सरकारी अधिकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

SCROLL FOR NEXT